२० दिवसांत तब्बल १० रुपयांनी भडकले इंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:17+5:30
३१ मे रोजी पेट्रोलचा दर ७६ रुपये ५० पैसे, तर डिझेलचा दर ६५ रुपये ६१ पैसे होता. १९ जून रोजी ८५ रुपये ५३ पैसे, तर डिझेलचा दर ७४ रुपये ७५ पैसे तर २० जून रोजी शहरात पेट्रोलचा दर ८६ रुपये २ पैसे तर डिझेलचा दर ७५ रुपये ३१ पैसे होता. राज्य शासनाने एप्रिल महिन्यात एक तर जून महिन्यातइंधनावर तीन रुपये अधिभार वाढविला. केंद्र शासनाने इंधनाचे दर वाढविणे अथवा कमी करण्याचे अधिकार कंपन्यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंंधनाच्या दरात वाढ झाल्याने मागील पंधरा दिवसांत इंधनाच्या दरात सुमारे १० रुपयांनी वाढ झाली आहे. शनिवारी वर्ध्यात पेट्रोलचा दर ८६ रुपये २ पैसे तर डिझेलचा दर ७५ रुपये ३१ पैसे होता. या दरवाढीमुळे नागरिकांसह व्यावसायिक हतबल झाले आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे रोजगार आणि अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. परिणामी, कित्येकांसमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आता इंधनाच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊन काळात रस्त्यावर येणारी हजारो वाहने थांबली. त्याचा परिणाम इंधन विक्रीवर झाला. शहर आणि परिसरात दररोज पेट्रोल आणि डिझेलची लाखो रुपयांवर विक्री होते. मात्र, लॉकडाऊन काळात इंधन विक्रीेचे प्रमाण निम्म्यावर आले होते. त्याचा फटका पेट्रोलपंप मालकांना बसला.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली तरी बाजारपेठेतील उलाढाल थांबल्याने इंधन टाकण्यास नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे इंधनाच्या विक्रीवर परिणाम झाला असल्याची माहिती पेट्रोलपंपमालकांनी दिली. ३१ मे रोजी पेट्रोलचा दर ७६ रुपये ५० पैसे, तर डिझेलचा दर ६५ रुपये ६१ पैसे होता. १९ जून रोजी ८५ रुपये ५३ पैसे, तर डिझेलचा दर ७४ रुपये ७५ पैसे तर २० जून रोजी शहरात पेट्रोलचा दर ८६ रुपये २ पैसे तर डिझेलचा दर ७५ रुपये ३१ पैसे होता. राज्य शासनाने एप्रिल महिन्यात एक तर जून महिन्यातइंधनावर तीन रुपये अधिभार वाढविला. केंद्र शासनाने इंधनाचे दर वाढविणे अथवा कमी करण्याचे अधिकार कंपन्यांना दिले आहेत.
यामुळेही इंधन दरवाढीत भर पडली आहे. मागील २० दिवसांच्या काळात तब्बल १० रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे पेट्रोलपंप मालक राजपाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.
वेळेच्या मर्यादेचाही विक्रीवर परिणाम
लॉकडाऊन काळात सकाळी ७ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच पेट्रोलपंप सुरू ठेवण्यास मुभा होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर सायंकाळी ६ वाजतापर्यंत पेट्रोलपंप सुरू ठेवण्यास प्रशासनाने सवलत दिली. यामुळे पेट्रोल विक्रीवर मोठा परिणाम होत असल्याचेही पेट्रोलपंपमालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.