फुलसावंगीत माहिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:53+5:302021-04-17T04:40:53+5:30
महिलांनी सरपंच, उपसरपंच यांच्यावर पाणी प्रश्नाचा भडीमार केला. अखेर सरपंच, उपसरपंच यांनी मोर्चेकरी माहिलांची कशीबशी समजूत काढून मोर्चा परत ...
महिलांनी सरपंच, उपसरपंच यांच्यावर पाणी प्रश्नाचा भडीमार केला. अखेर सरपंच, उपसरपंच यांनी मोर्चेकरी माहिलांची कशीबशी समजूत काढून मोर्चा परत पाठविला. येथे निंगनूर येथील लघु तलावातून पाणी पुरवठा होत होता. मात्र, पाईप लाईन बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त असल्याने ग्रामपंचायतीने खोदलेल्या विहिरीमधून गावाला पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीने त्वरित पाईप दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी कौशल्या सावळे, रंजना पाटील, भाग्यश्री वाठोरे, आम्रपाला वाठोरे, पूजा वाठोरे, मिना बरडे, संगीता बरडे, वच्छला वाठोरे, सविता साबळे, रेखा कोकणे, जोत्स्ना भगत, इंदू भगत, शालिनी सावळे, रमाबाई भगत, वनिता काकडे, सुलोचना साबळे, अर्चना वाठारे, ज्योती भगत आदींनी ग्रामपंचयतीवर धडक दिली.
सध्या फुलसावंगी ते निंगनूर या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता खोदकामात अनेकदा पाईप फुटतात. दोन दिवसांपासून निंगनूर फीडरवरील लाईन बंद असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे उपसरपंच जनाब जानी कमर बेग यांनी सांगितले. अरुण भगत यांनी महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याची समस्या असून, प्रभाग प्रतिनिधीला समस्या सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला.