सिंचन प्रकल्पासाठी मिळणार निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:00 AM2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:17+5:30

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे तसेच अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध समस्यांबाबतही सखोल आढावा घेतला.

Funds for irrigation projects | सिंचन प्रकल्पासाठी मिळणार निधी

सिंचन प्रकल्पासाठी मिळणार निधी

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची ग्वाही : जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे तसेच अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध समस्यांबाबतही सखोल आढावा घेतला.
विधिमंडळ सभागृहात सोमवारी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ.वजाहत मिर्झा, ख्वाजा बेग, अ‍ॅड. नीलय नाईक, संजय राठोड, अ‍ॅड. इंद्रनील नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे, प्राचार्य डॉ. अशोक उईके, नामदेव ससाणे, संजीवरेड्डी बोदकुरवार या आमदारांसह किशोर तिवारी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय मदतीचा निधी जिल्ह्यांना पोहोचला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०२ कोटींचे वाटप झाले असून दुसऱ्या टप्प्यात २२२ कोटींची मदत वाटप सुरू आहे.
जिल्ह्यातील जलसंधारणाच्या प्रकल्पांची प्रगती, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतीतील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची सद्यस्थिती, जिल्ह्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्पाचा आढावा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपाचा विज पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, मुख्यमंत्री पेयजल योजना आदींबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी माहिती
दिली.

आमदारांनी मांडल्या जिल्ह्यातील समस्या
यावेळी आमदारांनी सिंचन, रस्ते, अपूर्ण प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी, अल्पसंख्यांकाबाबतचा निधी, शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करणे, खनिज विकास निधी, पैनगंगा अभ्यायारण्यातील ४० गावांतील रस्त्यांचा प्रश्न, वसंतराव नाईक स्मृती स्थळासाठी निधी, पॉवर ग्रीडसाठी जमीन भूसंपादन, माळपठारावरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी तोडगा काढणे आदी समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

Web Title: Funds for irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.