यवतमाळात ‘इव्हीएम’ची प्रेतयात्रा
By Admin | Published: April 22, 2017 01:44 AM2017-04-22T01:44:40+5:302017-04-22T01:44:40+5:30
राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलनातर्फे शहरातून शुक्रवारी इव्हीएम मशिनची प्रेतयात्रा काढण्यात आली.
यवतमाळ : राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलनातर्फे शहरातून शुक्रवारी इव्हीएम मशिनची प्रेतयात्रा काढण्यात आली.
तिरंगा चौकातून ही प्रेतयात्रा निघाली. ती शहराच्या विविध भागात फिरली. आंदोलकांनी जनतेच्या मागणीनुसार बॅलेट पेपरवर नि:पक्ष निवडणूक घेण्याची मागणी केली. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आघाडीवरील देशांत इव्हीएम मशिनने मतदान घेतले जात नाही. मग भारतात का मतदान घेतले जाते, असा प्रश्न उपस्थित केला.
इव्हीएममुळे मतदानात गडबड झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. यामुळे इव्हीएम मशिनची प्रेतयात्रा काढून विरोध दर्शविण्यात आला. या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शेगोकार यांच्या नेतृत्वात प्रशांत मुनेश्वर, सारिका भगत, मनोज क्षीरसागर, गजानन परडखे, सतीश तिरमारे, अॅड.अनिल किनाके, हरिश राऊत, मधुसूदन अलोणे, सुनील लोणकर आदी सहभागी झाले होते.
(शहर वार्ताहर)