महागाईविरोधात काढली शवयात्रा

By admin | Published: October 18, 2015 02:40 AM2015-10-18T02:40:57+5:302015-10-18T02:40:57+5:30

यावर्षी सर्वत्र भडकलेली महागाई व कापसाला अत्यल्प भाव घोषित केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी शहरातून महागाई विरोधी शवयात्रा काढली.

The funeral procured against inflation | महागाईविरोधात काढली शवयात्रा

महागाईविरोधात काढली शवयात्रा

Next

मनसेचे आंदोलन : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
वणी : यावर्षी सर्वत्र भडकलेली महागाई व कापसाला अत्यल्प भाव घोषित केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी शहरातून महागाई विरोधी शवयात्रा काढली. ही शवयात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकून तेथे त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू असतानाच महागाईचा भडका उडाला आहे. सध्या तूरडाळ ७३ रूपयांवरून १९५ रूपयांवर पोहोचली आहे. चनाडाळ ५० रूपये वरून ९५ रूपये, उडीदडाळ ७१ वरून १३० वर, मूगडाळ ७० वरून ११० वर, तर मसूरडाळ ६९ रूपयांवरून १०० रूपयांवर पोहोचली आहे. या भरमसाठ वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडल्याचा आरोप मनसेने केला आहे. जीावनावश्यक वस्तूंचे दर भडकल्याने गरीब जनतेचे मोठे हाल होत आहे. या भाववाढीचा शेतकऱ्याला एकही रूपयांचा लाभ नसून केवळ दलाल व व्यापारी भाव वाढ करून सामान्य जनतेच्या जिवावर उठल्याचा आरोपही मनसेने केला आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य शासनाने केवळ जिल्ह्यामधील दोनच गावे दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असताना शासनाने केवळ दोनच गावे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप मनसेने केला आहे. संपूर्ण विदर्भच दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही मनसेने केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यात यावा, महागाई कमी करावी, आदी मागण्यांसाठी मनसेने ही शवयात्रा काढली होती. या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
नांदेपेरा मार्गावरील मनसेच्या कार्यालयापासून ही शवयात्रा काढण्यात आली. शवयात्रेत चौघांच्या खांद्यावर महागाईची तिरडी होती. तिरडीवर विविध घोषणा लिहिलेले फलक लावले होते. शवयात्रेसमोर मनसेचा एक कार्यकर्ता आगटे धरून होता. त्या मागे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महागाई कमी करा, शासनाचा निषेध असो, आदी घोषणा देत चालत होते. ही शवयात्रा आगळीवेगळी ठरली. नागरिकांनाही प्रथमदर्शनी कुणाचा तरी मृत्यू झाला असावा, त्याचीच ही शवयात्रा असावी, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्ष बघितल्यानंतर खरी स्थिती सर्वांना कळली. दरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, संतोष रोगे, रमेश सोनुले, शेख आजीद, रोशन शिंदे, उमेश वैरागडे, विनोद चोपणे, विनोद कुचनकर, मिलींद पेंदाने आदींना अटक करून गुन्हा दाखल केला. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना सायंकाळी सोडण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The funeral procured against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.