बुरशीजन्य आजाराने रुग्ण बेजार

By admin | Published: July 31, 2016 01:14 AM2016-07-31T01:14:45+5:302016-07-31T01:14:45+5:30

केळापूर तालुक्यातील पिंपळशेंडा या गावात बुरशीजन्य आजाराची लागण अनेकांना झाली आहे.

Fungal Disease sufferers suffer | बुरशीजन्य आजाराने रुग्ण बेजार

बुरशीजन्य आजाराने रुग्ण बेजार

Next

पिंपळशेंडा : रुंझा आरोग्य केंद्राच्या शिबिरात तपासणी व औषधोपचार
रुंझा : केळापूर तालुक्यातील पिंपळशेंडा या गावात बुरशीजन्य आजाराची लागण अनेकांना झाली आहे. या आजाराने छाती, पोट, हात, पाय यासह इतर ठिकाणीही मोठमोठे चट्टे पडून खाज सुटल्याने रुग्ण बेजार झाले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात रुग्ण तपासणी करून औषधोपचार केले जात आहे.
पिंपळशेंडाचे उपसरपंच हरिहर लिंगनवार यांनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेऊन सदर आजाराविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या मार्गदर्शनात शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ.पी.आर. राठोड यांच्यासह डॉ. अमर सुरोशे, डॉ. आनंद सारस्वत, डॉ. महंमद इरफान, डॉ. ज्योती दुधाळकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विठ्ठल बुच्चे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तिम्मेवार, सरपंच निर्मला धुर्वे, उपसरपंच हरिहर लिंगनवार, सचिव एन.एम. निमसटकर यांचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)

Web Title: Fungal Disease sufferers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.