शकुंतलेच्या रक्षणाला गब्बर डाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:58 AM2017-09-18T00:58:57+5:302017-09-18T00:59:08+5:30

अरे ओ सांभा... कितने आदमी थे.. शोले सिनेमातल्या गब्बरचा हा डॉयलॉग खलप्रवृत्तीच्या लोकांना घबरवणारा आहे. लोकांना लुटणाºया डाकूची तीच गर्जना कदाचित यवतमाळच्या शकुंतलेचे रक्षण करेल, ....

 Gabbar Daku to protect Shakuntala | शकुंतलेच्या रक्षणाला गब्बर डाकू

शकुंतलेच्या रक्षणाला गब्बर डाकू

Next
ठळक मुद्देरेल्वेचा नियम : २५ रुपयांचे तिकीट अन् ५०० रुपयांचा दंड

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अरे ओ सांभा... कितने आदमी थे.. शोले सिनेमातल्या गब्बरचा हा डॉयलॉग खलप्रवृत्तीच्या लोकांना घबरवणारा आहे. लोकांना लुटणाºया डाकूची तीच गर्जना कदाचित यवतमाळच्या शकुंतलेचे रक्षण करेल, असा ग्रह रेल्वेप्रशासनाने करून घेतल्याचे दिसते. त्यामुळे शकुंतलेच्या अवतीभवती घाण करणाºयांसाठी खास सूचना वजा गर्जना लावण्यात आली आहे...‘अरे ओ सांभा.. कितना जुर्माना रखे है सरकारने रेल परिसर मे गंदगी फैलाने पर?’ अशा डॉयलॉगसह गब्बरचा फोटो अन् ताबडतोब खाली सांभाचे उत्तरही...‘५०० रुपये पुरे ५०० रुपये!’
यवतमाळ रेल्वेस्थानकावरून एकमेव शकुंतला रेल्वे येते आणि जाते. दिवसातून एकदा तिची चक्कर झाली की संपूर्ण स्थानकाचा परिसर जुगारी, दारूडे यांच्या तावडीत सापडतो. शकुंतलेने प्रवास करणाºयांची संख्याही अत्यल्प असल्याने स्थानकावरील या ‘आवारागर्दी’ला हटकणारेही कुणीच नसते. स्थानकावरील कर्मचाºयांची संख्या एक किंवा दोन एवढीच, त्यामुळे पायबंद घालणे अशक्य.
शकुंतला एकटीच, लहानशीच आणि अत्यंत हळूवार असली तरी तिच्या रेल्वेस्थानकाचा परिसर मात्र विस्तृत आहे. भर दिवसाही तेथे अनेक गैरप्रकार सुरू असतात. रात्रीच्या अंधारात तर रेल्वेचा ट्रॅक जीवनाचा ट्रॅक चुकलेल्या तरुणांच्या ताब्यात जातो. त्यामुळे शकुंतलेच्या स्थानकावर दारूच्या बाटल्या आढळतात. दिवसभर गंजीपत्याचे डाव रंगलेले असतात. पान-खºर्याच्या पिचकाºयांनी भिंती रंगतात. मोकाट कुत्रे थेट तिकिट खिडकीच्या खालीच निजलेले असतात. हे वातावरण बदलून स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेने विविध प्रकारच्या सूचना लावून पाहिल्या.
पण व्यर्थ ठरल्या. त्यामुळे आता थेट डाकू गब्बरसिंगची छबी दाखवून मस्तीखोरांना पिटाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथून मूर्तिजापूरची तिकिट २५ रुपये आहे. मात्र, शकुंतलेच्या परिसरात साधे थुंकताना जरी कुणी आढळले तरी, त्याला ५०० रुपयांचा दंड लावण्यात येईल, अशी माहिती स्थानक कर्मचाºयाने दिली.

गब्बरलाही घाबरेना टमरेलधारी
शकुंतला रेल्वे स्थानकाचा परिसर विस्तीर्ण असून शहरवासीयांच्या वर्दळीपासून दूर आहे. त्यामुळे रेल्वेच्या रूळाचा वापर प्रात:विधीसाठी करताना अनेक जण आढळतात. विशेष म्हणजे नगरपरिषदेने लावलेले ‘फिरते शौचालय’ टाळून लोक शकुंतलेच्याच मार्गावर बसतात. अनेकांसाठी तर हा ‘स्मोकींग झोन’ बनलेला आहे. गब्बरचा फोटो आणि त्याचा खुमासदार डायलॉग चिटकवूनही हे टमरेलधारी रूळ सोडायला तयार नाही. अद्यापही ट्रॅक परिसर आणि स्थानकाच्या अगदी दारातही दारूच्या बाटल्या आढळतात. विशेष म्हणजे, स्वच्छतेसाठी दरडावणारा गब्बर चिकटविण्यात आला, पण तो स्वत:ही हातावर तंबाखूच मळताना दिसतो, यातच खरी गोम दडलीय!

Web Title:  Gabbar Daku to protect Shakuntala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.