पुसदमध्ये वृक्षारोपणाने गाडगेबाबा जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:33+5:302021-03-01T04:49:33+5:30

पुसद ... स्वच्छतेतून ग्रामविकासाचा मार्ग दाखविणारे थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी भजन, कीर्तनाच्या माध्यमातून मानवाला अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या ...

Gadge Baba Jayanti celebrated with tree planting in Pusad | पुसदमध्ये वृक्षारोपणाने गाडगेबाबा जयंती साजरी

पुसदमध्ये वृक्षारोपणाने गाडगेबाबा जयंती साजरी

Next

पुसद ... स्वच्छतेतून ग्रामविकासाचा मार्ग दाखविणारे थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी भजन, कीर्तनाच्या माध्यमातून मानवाला अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी, परंपरा दूर करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांची जयंतीही येथे वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली.

येथील वसुंधरा बहुउद्देशीय संस्था गेल्या पाच वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करीत आहे. परिसराला प्रदूषणमुक्त व सदाहरित पर्यावरणाचे संवर्धन कार्य करत आहे. संस्थेने परिसरात पाच लाख वृक्षारोपण आणि रोपण केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या समाजसुधारणेच्या विचारातून मानवाला पृथ्वीवर जगण्यासाठी निसर्गाचे समतोल ठेवावेच लागेल, अन्यथा पुढील भविष्य नरकासारखे असेल.

हे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता वसुंधरा बहुउद्देशीय संस्था आणि सेव्ह नेचर ग्रुप व कासोळा गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून कासोळा येथील वन परिसरामध्ये वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा कार्यक्रम घेतला. यावेळी मोतीराम राठोड, सखाराम राठोड, जगदीश जाधव, अरविंद गंगात्रे, शक्ती दास, सुशील कदम, संजय गोदमले, यश दास, वामन राठोड, संदीप जाधव, प्रशांत गावंडे, अनिल गिरगावकर, सतीश हरणे, अमोल गंगात्रे, नितीन चव्हाण यांची उपस्थिती लाभली.

Web Title: Gadge Baba Jayanti celebrated with tree planting in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.