राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक पुसदचा गणबादेव गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:33 PM2019-09-02T21:33:52+5:302019-09-02T21:34:30+5:30

पूस नदीतीरावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ मध्ये शेतकरीपुत्र धारू पाटील यांनी गणबादेव गणपतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर सखाराम पाटील, दत्तराम पाटील, शेषराव पाटील व आता शरद पाटील यांनी ही परंपरा कायम राखत गणबादेवाची स्थापना सुरू ठेवली. गणबादेवासाठी खास रथाची निर्मिती केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील मुस्लीम कारागिर सरफराज शेख यांनी तयार केलेल्या रथातून मानाच्या गणबादेव गणपतीची पारंपरिक वाद्याच्या गजरात स्थापना केली जाते.

Ganapadeva Ganapati of Pusad, a symbol of national unity | राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक पुसदचा गणबादेव गणपती

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक पुसदचा गणबादेव गणपती

Next
ठळक मुद्दे११५ वर्षांची परंपरा : राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त

प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून येथील गणबादेव गणपतीची ख्याती आहे. या गणपतीला ११५ वर्षांची परंपरा लाभली आहे. सर्वधर्म समभाव जोपासत या मानाच्या गणपतीची स्थापना केली जाते.
पूस नदीतीरावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ मध्ये शेतकरीपुत्र धारू पाटील यांनी गणबादेव गणपतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर सखाराम पाटील, दत्तराम पाटील, शेषराव पाटील व आता शरद पाटील यांनी ही परंपरा कायम राखत गणबादेवाची स्थापना सुरू ठेवली. गणबादेवासाठी खास रथाची निर्मिती केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील मुस्लीम कारागिर सरफराज शेख यांनी तयार केलेल्या रथातून मानाच्या गणबादेव गणपतीची पारंपरिक वाद्याच्या गजरात स्थापना केली जाते.
गेल्या पाच पिढ्यांपासून येथील भोई बांधव गणबादेवाचा रथ ओढतात. पुसदचे ग्रामदैवत म्हणून गणबादेवाची ओळख निर्माण झाली आहे. सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या गणबादेव गणेशोत्सवात विविध सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. मिरवणुकीत सर्वधर्मीय सहभागी होतात. यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो.
या गणपतीला राज्य शासनाचा उत्कृष्ट गणपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. सध्या गणबादेव गणेश मंडळाची जबाबदारी शरद पाटील, सुधाकर वासीमकर, चंद्रकांत सेता, अनिल पाटील, सतीश पंडितकर, सुदेश सांबरे, सुरेश चौधरी, संजय पाटील, ऋषीकेश पंडितकर, दीपक देशमुख, अ‍ॅड.विनोद पाटील सांभाळत आहे.

विसर्जन मिरवणुकीत अग्रभागाचा मान
दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत गणबादेव गणपतीला अग्रभागी मानाचे स्थान दिले जाते. त्यानंतर इतर सर्व गणेश मंडळांच्या मूर्त्या असतात. गणबादेव गणपती मंडळाने तब्बल १४ किलो चांदीचे रत्नजडीत सिंहासन तयार केले आहे. याच सिंहासनावर गणबादेवाची स्थापना होते. त्याला ११ ग्रॅम सोन्याचे दंत बसविले जाते. गणबादेवाच्या दर्शनासाठी शहरासह तालुक्यातील भक्त गर्दी करतात.

Web Title: Ganapadeva Ganapati of Pusad, a symbol of national unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.