शिक्षकांची बदलीसाठी गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:02+5:30
राज्य शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी तीन वर्षांपूर्वी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. त्यात आतापर्यंत तीन टप्पे पार पडले असून त्यातून हजारो शिक्षक गृहजिल्ह्यात परतले आहेत. आता चौथ्या टप्प्याची प्रक्रिया जानेवारीत सुरू झाली. त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यावर अचानक राज्यात लॉकडाऊन झाल्याने केवळ १० टक्के कामासाठी चौथा टप्पा थांबलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आंदोलन म्हटले की घोषणा, नारेबाजी हा प्रकार ठरलेलाच. पण आंतरजिल्हा बदलीच्या मागणीसाठी राज्यातील अडीच हजार शिक्षकांनी लॉकडाऊन असतानाही गांधीगिरीस्टाईल अनोखे आंदोलन केले. शिक्षण राज्यमंत्र्यांच्या नावाने झाडे लावून तेथेचे मागणीचे फलकही लावले.
राज्य शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी तीन वर्षांपूर्वी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. त्यात आतापर्यंत तीन टप्पे पार पडले असून त्यातून हजारो शिक्षक गृहजिल्ह्यात परतले आहेत. आता चौथ्या टप्प्याची प्रक्रिया जानेवारीत सुरू झाली. त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यावर अचानक राज्यात लॉकडाऊन झाल्याने केवळ १० टक्के कामासाठी चौथा टप्पा थांबलेला आहे. त्याचवेळी वित्त विभागाने बदल्यांवर कोरोनामुळे निर्बंध आणले आहेत.
या पार्श्वभूमीवर वंचित शिक्षक चौथा टप्पा पूर्ण करण्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने गांधीगिरी स्टाईल आंदोलन करण्यात आले. शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छांसोबतच मागणी रेटण्याच प्रयत्न या आंदोलनातून करण्यात आला. अडीच हजार शिक्षकांनी पाच लाख झाडे लावून, प्रत्येक झाडासोबत बदलीच्या मागणीचे पत्रकही लावले.