आर्णी येथे ग्रामसेवक संघटनेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:19 AM2017-11-24T01:19:21+5:302017-11-24T01:19:34+5:30
तालुक्यात विविध ठिकाणी ग्रामसेवक मंडळींना मारहाण तर काही गावांमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तरी सुद्धा यामध्ये संबधीत आरोपींवर कार्यवाही होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यात विविध ठिकाणी ग्रामसेवक मंडळींना मारहाण तर काही गावांमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तरी सुद्धा यामध्ये संबधीत आरोपींवर कार्यवाही होत नाही. त्यांना पोलीस अभय देत असल्याचा आरोप करून ग्रामसेवक संघटनेने पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले. तसेच जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची अशी भूमिका ग्रामसेवक संघटनेने घेतली आहे.
यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये देऊरवाडी येथील ग्रामसेवक नागरगोजे यांना जीवे मारण्याची देण्यात येऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता, यातील आरोपीवर त्वरीत कारवाई करा, केळझरा येथील सचिव कुंजरू पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करा, तसेच पवार यांच्यावरील खोटे आरोप मागे घ्या, उमरी येथील सचिव प्रदीप देशमुख यांच्या कामात अडथळा तसेच त्यांना धमकी देणाºया महिला सरपंचाच्या पतीवर कार्यवाही व्हावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यासाठी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, सचिव नागरगोजे, उपाध्यक्ष सुनील कुंजरूपवार, तांबडे, हिवराळे, सी. आर. धोटे, शिवाजी गावंडे, डी. टी. राठोड, पी. एन. रत्नपारखी, व्ही. आर. राऊत, एस. डी. चव्हाण, के. डी. वारकड, काळे, जगताप, वडे, पी. डी. देशभ्रतार, पी. एस. गावंडे, सी. एल. झास्कर, महाजन, राठोड, अंबुरे, आडे, नामदेव वार, सोळंके, डी.बी. पवार, सुधाकर निंबाळकर, खोब्रागडे, सोनुले आदी ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.