दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद; शहरातील दुकान फोडीमागे दिग्रसच्या टोळीवर संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:39 PM2020-02-16T18:39:35+5:302020-02-16T18:40:06+5:30

दुकानाचे शटर वाकवून मुद्देमाल लंपास करणारी टोळी सक्रिय आहे.

Gangs arrested for robbery attempt; Digris gang suspected behind town shop Fodie | दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद; शहरातील दुकान फोडीमागे दिग्रसच्या टोळीवर संशय

दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद; शहरातील दुकान फोडीमागे दिग्रसच्या टोळीवर संशय

Next

यवतमाळ : दुकानाचे शटर वाकवून मुद्देमाल लंपास करणारी टोळी सक्रिय आहे. या टोळीने आतापर्यंत लाखोंचा मुद्देमाल उडविला. पोलीस पथके टोळीच्या मागावर असताना दत्त चौकातील नगरपरिषद मार्केटसमोर संशयित आॅटो व त्यात सहा जण आढळून आले. या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व अवधूतवाडी पोलिसांनी संयुक्तपणे ताब्यात घेतले. 

नदीम बेग नसीम बेग, मोहम्मद अनवर मोहम्मद शमिम, एजाज भग्गू मिरावाले, राजा मधुकर तांडेकर, परवेजखान एहसान उल्लाह खान, आकाश सुभाष शिंदे सर्व रा.मोतीनगर व चंदननगर (दिग्रस) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याजवळून नांदेड पासिंग असलेला ऑटोरिक्षा (एम.एच.२६/एन.११८७) जप्त केला. हे सर्वजण एकत्र येऊन दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होते. तसे साहित्य त्यांच्याकडे आढळले.

ऑटोरिक्षासोबतच मोटरसायकल, लोखंडी गज, चाकू, मिरचीपूड, चाकू मिळून आले. त्यांच्याजवळून ४३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवधूतवाडी ठाण्यात भादंवि ३९९ व ४०२ नुसार गुन्हा दाखल केला. सहाही आरोपींविरुद्ध दिग्रससह इतर पोलीस ठाण्यात चोरी, मारामारी, संशयास्पद फिरणे असे गुन्हे दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी अवधूतवाडी ठाण्यात तक्रार दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे करत आहे. 

कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमोद पाचकवडे, पीएसआय सचिन पवार, जमादार बंडू डांगे, योगेश गटलेवार, विनोद राठोड, हरिश राऊत, विशाल भगत, गजानंद हरणे, मो.जुनेद, सुरेंद्र वाकोडे, पीएसआय नागेश खाडे, येंडे, शेख सलमान, सुधीर पुसदकर यांनी सहभाग घेतला.

Web Title: Gangs arrested for robbery attempt; Digris gang suspected behind town shop Fodie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.