बदलत्या वातावरणाने कृषी उत्पादन गारद

By admin | Published: January 8, 2016 03:10 AM2016-01-08T03:10:13+5:302016-01-08T03:10:13+5:30

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती.

Garment production in changing environment | बदलत्या वातावरणाने कृषी उत्पादन गारद

बदलत्या वातावरणाने कृषी उत्पादन गारद

Next

कापसावर तेल्या रोग : एक महिन्यापूर्वीच तुरीचा हंगाम संपला
रूपेश उत्तरवार यवतमाळ
दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती. भाव तर मिळाला नाहीच, पण रोगांच्या आक्रमणाने बहुतांश शेतकऱ्यांची उभी पऱ्हाटी वाळून गेली. सातत्याने बदलणाऱ्या वातावरणाचा हा दुष्परिणाम असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असले तरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना अजूनही दृष्टिपथात नाहीत. ही कथा केवळ कापसाचीच नाही, तर खरिपातील सोयाबीन आणि तुरीलाही फटका बसला आहे. अन् आता रब्बी पिकांनाही बदलत्या वातावरणाची झळ पोहोचली आहे.
ग्लोबल वार्मिंगने ऋतूचक्रच प्रभावित झाले आहे. पावसाळा एक महिना पुढे सरकला आहे. थंडीच्या महिन्यात थंडी पडेनाशी झाली. याचा परिणाम थेट कृषी क्षेत्रावर पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे होते. त्या खालोखाल सोयाबीन आणि तूर पीक घेण्यात आले. खरिप हंगाम संपण्यात जमा झाला आहे. कोरडवाहू क्षेत्रात उलंगवाडीची स्थिती आहे. ओलिताची अवस्था अशीच बिकट होत आहे.
ढगाळी वातावरण आणि धुवारीमुळे कापसाचे पीक प्रभावित झाले आहे. कपाशीवर तेल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे पाने करपायला सुरवात झाली आहे. पान तेलकट आणि काळे पडत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हादरले आहे. कोरडवाहू क्षेत्रात शेतकऱ्यांना एकरी काही किलो आणि क्विंटलचा अ‍ॅव्हरेज आला. तर ओलितात दोन अथवा तीन क्विंटलचा सरासरी वेचा निघाला आहे. सोयाबीन आणि कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीला मूठभर शेंगा आणि हिरवा पालाच राहीला. बदलत्या वातावरणाने तुरीवर किडीचे आक्रमण झाले. धुवारीने गळ झाली. सात बारांपैकी काही बार फळलेच नाही. परिणामी फेब्रुवारी महिन्यात निघणारी तूर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांचा दारात आली. परंतु, त्यातून २-४ कट्टे तूर निघणेही अवघड झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून थ्रेशर मशिन माघारी फिरल्या. तुरीला जरी चांगले दर असले, तरी शेतकऱ्यांच्या शेतात तुरीचे उत्पादन नसल्यातच जमा आहे.
गव्हाची आणि हरभऱ्याची स्थितीही भयावह आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी शेतात गहू आणि हरभरा पेरला. मात्र थंडीचा पत्ताच नाही. या दोनही पिकांना थंडी आवश्यक आहे. थंडीअभावी गव्हाच्या उंबयांचा आकार निम्माच झाला आहे. थंडीअभावी हरभऱ्यावरही किडीचे आक्रमण झाले आहे. यामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Web Title: Garment production in changing environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.