परजना येथे गॅस्ट्रोचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:25 AM2017-07-22T02:25:45+5:302017-07-22T02:25:45+5:30

गॅस्ट्रोची लागण झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना परजना येथे शुक्रवारी घडली.

Gastro victim at Parja | परजना येथे गॅस्ट्रोचा बळी

परजना येथे गॅस्ट्रोचा बळी

Next

‘पीएचसी’चा हलगर्जीपणा : थातुरमातूर उपचार करून घरी पाठविले
शिरसगाव(पांढरी) : गॅस्ट्रोची लागण झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना परजना येथे शुक्रवारी घडली. गजानन चव्हाण (४०) असे मृताचे नाव आहे. प्रकृती गंभीर झाल्याने यवतमाळ येथे हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
गजानन चव्हाण यांना गुरुवारपासूनच उलट्या आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. उपचारासाठी शिरसगाव(पांढरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सलाईन आणि इतर औषधोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र गॅस्ट्रोचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा या आरोग्य केंद्रात आणण्यात आले. डॉक्टरांनी यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
दरम्यान, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गजानन चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गजाननच्या मृत्यूस शिरसगाव पांढरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी यावेळी केला. गुरुवारी थातुरमातूर उपचार करून गजाननला घरी पाठविण्यात आले. रुग्णालयात दाखल करून घेतले असते तर योग्य उपचार झाले असते. या सर्व बाबी टाळल्याने गजानन चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. उमरठा-परजनाच्या सरपंच प्रभाताई खोडे यांनीही गजाननच्या मृत्यूस आरोग्य अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. सदर प्रकरणी तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेत
जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांनी शुक्रवारी परजना गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गजानन चव्हाण यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून घ्यायला पाहिजे होते, असे त्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी अमोल काळे यांच्यावर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. यावेळी साथरोग अधिकारी गोषटवार, नेरचे गटविकास अधिकारी राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी दुर्गे आदी उपस्थित होते.

Web Title: Gastro victim at Parja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.