आरोपींच्या अटकेसाठी गवळी समाजाची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:40 PM2019-05-10T23:40:52+5:302019-05-10T23:41:44+5:30
गवळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा गवळी समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. हुंडीवाले यांची ६ मे रोजी अकोला येथे हत्या करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गवळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा गवळी समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. हुंडीवाले यांची ६ मे रोजी अकोला येथे हत्या करण्यात आली.
सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींना तत्काळ अटक करावी, सदर प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी, या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, राजकीय दबावात न येता घटनेची नि:पक्ष चौकशी करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे. अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तत्पूर्वी किसनराव हुंडीवाले यांना समाजबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जिल्हा गवळी समाजाचे पंडितराव चावरे, संतोष डोईजड, अशोक भाले, विलास झेंडे, विजय चौधरी, अॅड. अमित खताडे, संजय काळे, सुधाकर डोळे, दशरथ कालोकार, पंजाबराव अवथळे, मनोहर चौकोने, राजेश बाविस्कर, राधेश्याम चेले, घनश्याम जाधव, ओंकार चेके, दिलीप कटकुळे, दीपक खताडे, संजय भैरट, अक्षय डोईजड, अरविंद डोईजड, घनश्याम झामरे, राजू घाटोळ, अनिल चावरे, गजानन डोईजड यांच्यासह गवळी समाज संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.