शहरातून अप-डाऊन करा, पण आमचीच शाळा मागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:21+5:30

शासनाच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा परिषद शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यात शिक्षकांना उपलब्ध शाळापैकी रिक्त जागेवर बदली मागता येणार आहे. मात्र समुपदेशनात बहुतांश शिक्षक शहराजवळच्या शाळा निवडतात, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे दुर्गम गावातील शाळा कायम वंचितच राहतात.

Get up-and-down from the city, but ask for our school! | शहरातून अप-डाऊन करा, पण आमचीच शाळा मागा!

शहरातून अप-डाऊन करा, पण आमचीच शाळा मागा!

Next
ठळक मुद्देदुर्गम गावातील शिक्षकांची विनवणी। सोमवारी समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आमच्या शाळेत जागा आहे... गाव दुर्गम असले तरी तुम्ही यवतमाळातूनही अप-डाऊन करू शकता.. प्लीज सर समुपदेशनात आमची शाळा मागा.. आमच्या शाळेत या..! अशी आळवणी सध्या शिक्षक एकमेकांना करताना दिसत आहे. सोमवारी होणाऱ्या समुपदेशनातून आपल्या शाळेला शिक्षक मिळाल्यास आपला ताण कमी होईल, या आशेने ही विनवणी केली जात आहे.
शासनाच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा परिषद शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यात शिक्षकांना उपलब्ध शाळापैकी रिक्त जागेवर बदली मागता येणार आहे. मात्र समुपदेशनात बहुतांश शिक्षक शहराजवळच्या शाळा निवडतात, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे दुर्गम गावातील शाळा कायम वंचितच राहतात. वर्षानुवर्षे अशा शाळांवर शिक्षकांचा तुटवडा असल्याने तेथे कार्यरत शिक्षक बेजार झाले आहेत. वर्ग अध्यापनासोबत मुख्याध्यपकाचाही प्रभार त्यांना सांभाळावा लागतोय. वणी, उमरखेड, मारेगाव, झरी तालुक्यात प्रामुख्याने ही स्थिती आहे.
आॅनलाईन बदली प्रक्रियेतही शिक्षकांना २० शाळांचे पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळाली होती. त्यामुळे दुर्गम शाळा कोणीही निवडल्या नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ५०० पेक्षा अधिक शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा कमी शिक्षक कार्यरत आहेत. आता सोमवारी जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा समुपदेशन प्रक्रिया ठेवली आहे. तेव्हाही शिक्षक शहरालगतच्याच शाळा मागतील आणि दुर्गम शाळा वंचितच राहतील, अशी भीती दुर्गम शाळेतील शिक्षकांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी बदली इच्छूक शिक्षकांना विनवणी सुरू केली आहे. भले गावात राहू नका, यवतमाळवरून पांढरकवडावरून, वणीतून अप-डाउन करा पण आमचीच शाळा समुपदेशनात मागा, अशी विनंती शिक्षकच शिक्षकांना करीत आहेत. प्रत्यक्षात प्रशासन अशा दुर्गम शाळांचा विचार करून तेथे शिक्षक देतील का, हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: Get up-and-down from the city, but ask for our school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.