वाहतूक कोंडीतून सुटका करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:23 AM2018-03-24T00:23:49+5:302018-03-24T00:23:49+5:30

शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढून शहरवासीयांना दिलासा द्यावा, .......

Get rid of traffic jams | वाहतूक कोंडीतून सुटका करा

वाहतूक कोंडीतून सुटका करा

Next
ठळक मुद्देप्रतिसाद फाऊंडेशन : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढून शहरवासीयांना दिलासा द्यावा, यासाठी प्रतिसाद फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून काही उपायही यात सुचविण्यात आले आहे.
बसस्थानक चौकात पोलीस चौकी एका कडेला आहे. वाहतूक व्यवस्था चौकीत बसून हाताळली जाते. तांत्रिकदृष्ट्या दारव्हा व आर्णी रस्ता या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. वाहतूक पोलीस हजर राहिल्यास अपघात टाळले जाऊ शकतात. दारव्हा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची सतत ये-जा सुरू असते. ट्रॅव्हल्सचे चालक सिग्नल ओलांडेपावेतो धावत्या गाडीतूनच प्रवासी भरत नेतात. त्यामुळेही अपघात होतात. याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.
आर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही खासगी बसेस एकेरी मार्गातून वाहन टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. या वाहनांचा मार्ग बायपासवरून केल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही. शहराबाहेरून वळण रस्त्याची सोय आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात जड वाहतूक थांबविल्यास अपघात टळू शकतात. बसस्थानक चौकातील सिग्नलचे टाईमर केवळ २२ सेकंद आहे. प्रत्येकजण आपले वाहन समोर काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सिग्नलचे टाईमर वाढविले जावे.
अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली वाहन टोर्इंग करून नेले जाते. कायद्याप्रमाणे सूचना केल्यानंतरच वाहन टोर्इंग केले जावे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना आखल्यास वाहतुकीच्या कोंडीतून शहरवासीयांची सुटका होऊ शकते, असे यावेळी सुचविण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी या समस्येवर आठ-पंधरा दिवसात तोडगा काढला जाईल, असे सांगितले. यावेळी प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने, प्रलय टिप्रमवार, विनोद नराये, अजय बोरेले, रवी माहुरकर, विनोद दोंदल, सचिन कावरे, राजेश इसाळकर, अनिल तांबेकर, गजानन राऊत, किशोर गावंडे, प्रकाश लांजेवार, शशी राय, शंकी यादव, शुभम संगीतराव आदी उपस्थित होते.

Web Title: Get rid of traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.