रूढी आणि परंपरेच्या जोखडातून मुक्त व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 09:28 PM2018-01-07T21:28:54+5:302018-01-07T21:29:41+5:30

महिला शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने ज्ञानी झाल्या पाहीजे, याकरिता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड खास्ता खाल्ल्या. त्यांचे विचार संबंध महिलांना आजही प्रेरणादायी असून ते १00 टक्के स्वीकारून स्त्रियांनी अनिष्ट रूढी, परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचे आवाहन सुनंदा वालदे यांनी केले.

Get rid of the yoke of customs and traditions | रूढी आणि परंपरेच्या जोखडातून मुक्त व्हा

रूढी आणि परंपरेच्या जोखडातून मुक्त व्हा

googlenewsNext
ठळक मुद्देसुनंदा वालदे : दारव्हात सावित्राबाई जयंतीनिमित्त प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : महिला शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने ज्ञानी झाल्या पाहीजे, याकरिता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड खास्ता खाल्ल्या. त्यांचे विचार संबंध महिलांना आजही प्रेरणादायी असून ते १00 टक्के स्वीकारून स्त्रियांनी अनिष्ट रूढी, परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचे आवाहन सुनंदा वालदे यांनी केले.
येथील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे प्रांत उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे होते. तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष सुकुमार पेटकुले, विठ्ठलराव नाकतोडे, कवी मधुकर बावलकर, प्राचार्य दत्तात्रय राहाणे, माळी महासंघाचे उपाध्यक्ष अविनाश घाटे, डॉ. वसंत उमाये, डॉ. राजेश चौधरी, तालुकाध्यक्ष राजेंद्र घाटे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना उडाखे, डॉ. संतोष कोरडे, सुनिता शेंदुरकर, रवी नरटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, सुकुमार पेटकुळे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
यानिमित्त शहरातून सामाजिक संदेश देणारी रॅली काढण्यात आली. जीवन काळे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या चित्ररथावरील सावित्रीबार्इंची शाळा लक्षवेधी ठरली. फुले दांम्पत्याच्या वेषातील तृप्ती इंगोले, वैष्णवी ढाकुलकर, दुधगाव येथील फुलेंच्या रांगोळीचे प्रचंड कौतुक झाले.
मुलींची पहिली शाळा भिवेवाडा राष्ट्रीय स्मारक झालेच पाहिजे, अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले. तालुका संघटक विनोद शेंदूरकर, सुनील आरेकर, गणेश जवके, पुरुषोत्तम चंचलकर, सुनिता चौधरी, पुष्पाताई राऊत, प्रमोद राऊत, सुखदेव साबळे, विलास गाडे, विलास राऊत, प्रकाश ठाकरे, राजेश ढगे, राजू हळदे, पांडुरंग किरणापुरे, धनंजय काटकर, निरंजन घोडे, चेतन इंगोले, अमोल घाटे, गोपाल माधनकर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Get rid of the yoke of customs and traditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.