भारिप-बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:16 PM2018-04-03T22:16:10+5:302018-04-03T22:16:10+5:30

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना तत्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने यवतमाळसह जिल्हाभर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

 Ghantanad movement of Bharip-Bahujan Mahasangh | भारिप-बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन

भारिप-बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन

Next
ठळक मुद्देजिल्हाभर आंदोलन : संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना तत्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने यवतमाळसह जिल्हाभर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कोरेगाव भीमा प्रकरणात दंगलीची तक्रार नोंदविताना पहिल्या क्रमांकावर संभाजी भिडे यांचे नाव आहे. असे असतानाही त्यांना अटक झाली नाही. त्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाने राज्यव्यापी आंदोलन केले. त्याचे पडसाद यवतमाळातही उमटले. यवतमाळच्या तिरंगा चौकात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र तलवारे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कोम्बींग आॅपरेशन करून अटक केलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकानुसार तत्काळ मंजूर करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, महेश गावंडे यांच्या हत्येची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, पाणीटंचाई दूर करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन केले.
या आंदोलन संजीव इंगळे, वासुदेव काळे, कुंदन नगराळे, अवधूत पवार, माणिकराव गवई, प्रियदर्शनी डहाणे, सनी मोहळे, गुणवंत मानकर, धनंजय गायकवाड, आनंद भगत, नीलेश पाटील, राहुल राऊत, प्रशांत भारसागळे, प्रसन्नजित भवरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Web Title:  Ghantanad movement of Bharip-Bahujan Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.