घारफळचे आरोग्य केंद्र डॉक्टरविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:51 PM2019-08-04T21:51:50+5:302019-08-04T21:52:17+5:30

ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र घारफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरत असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय या केंद्राचा कारभार सुरू आहे. अनेकदा नागरिकांना उपचाराशिवाय परत जावे लागते. या केंद्रांतर्गत येणाºया उपकेंद्राची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.

Gharfal Health Center without a doctor | घारफळचे आरोग्य केंद्र डॉक्टरविना

घारफळचे आरोग्य केंद्र डॉक्टरविना

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांना मनस्ताप : उपकेंद्रातील कारभारही रामभरोसे, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती

संजय राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घारफळ : ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र घारफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरत असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय या केंद्राचा कारभार सुरू आहे. अनेकदा नागरिकांना उपचाराशिवाय परत जावे लागते. या केंद्रांतर्गत येणाºया उपकेंद्राची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.
पावसामुळे जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी लोकांना गावात असलेल्या आरोग्य केंद्राचाच आधार असतो. येथे असलेल्या आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाºयांची दोन पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात एकाच वैद्यकीय अधिकाºयावर दिवस ढकलले जात आहे. आता तर वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर अर्के यांची बदली झाली. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांशिवाय काम सुरू आहे. अमरावती येथील एका अधिकाºयाला याठिकाणी नियुक्ती देण्यात आली. त्यांनीही बदली रद्द करून घेतली.
या आरोग्य केंद्रांतर्गत घारफळ, पाचखेड, सरूळ, वाटखेड(बु) हे उपकेंद्र येतात. वैद्यकीय अधिकारीच नसल्याने सदर उपकेंद्राचे कर्मचारी उपस्थित राहात नाही. त्यामुळे हे उपकेंद्र नामधारी ठरले आहे. पहूर येथील वैद्यकीय अधिकाºयाची याठिकाणी तात्पुरती नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. अद्याप तरी ते रूजू झालेले नाही. परिसरातील परसोडी, सरूळ, सारफळ, गवंडी, खर्डा, एरंडगाव, गोंधळी, वडगाव, सिंदी, वरूड, रेणुकापूर, आष्टा रामपूर, बोरवघळ आदी गावातील नागरिकांना आता उपचारासाठी तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत आहे.
प्रहार संघटनेचे आरोग्य विभागाला निवेदन
घारफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराविषयी प्रहार संघटनेने आरोग्य विभागाला निवेदन दिले. गुरुवारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी तेथे केवळ दोन कर्मचारी हजर होते. रुग्णालय आणि परिसरात प्रचंड अस्वच्छता होती. सदर आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी द्यावा, कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी बाभूळगाव तालुका अध्यक्ष अतुल राऊत, उपाध्यक्ष शेख जावेद, आकाश राऊत, गणेश झुंबड, स्वप्नील वाघ, विश्वास लसवंते, मुकेश इंगळे, आकाश गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Gharfal Health Center without a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.