घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 09:55 PM2017-12-20T21:55:23+5:302017-12-20T21:55:58+5:30

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

Ghatanji water question fears to become serious | घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

Next
ठळक मुद्देवाघाडीच्या पाण्यावर सिंचन : शहर विकास आघाडीचे ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. हा प्रश्न घेऊन घाटी-घाटंजी शहर विकास आघाडीने मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. तहसीलदारांना मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, बांधकाम सभापती अनिल घोडे, आरोग्य सभापती विजय रामटेके, नगरसेवक सैयद फिरोज आदी उपस्थित होते.
शहराला सन १९७५ पासून नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. वाघाडी धरणातून पाणी घेऊन शहराला पुरविले जाते. नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातील १.२५ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित केले आहे. त्यातील ०.७५ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर नगरपरिषदेने केला आहे. ०.५० द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे. आरक्षित पाणी नदीमध्ये सोडले जात आहे. मात्र अनेक शेतकºयांनी मोटरपंपाद्वारे या पाण्याचा उपसा सिंचनासाठी करणे सुरू केले आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.
नगरपरिषदेतर्फे सिंचन विभागाकडे सहा लाख रुपयांचा भरणा आरक्षित पाण्यापोटी केला जातो. याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येते. उपलब्ध पाणी जून २०१८ पर्यंत शहराला कसे उपलब्ध होईल, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. वाघाडी धरण ते पाणी पुरवठा योजनेच्या प्लांटपर्यंत मोटारपंप बंद करण्याची कारवाई विद्युत व महसूल विभागाकडून अपेक्षित आहे.
यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. वैयक्तिक स्रात आटत चालले आहे. त्यामुळे संपूर्ण भिस्त नळ योजनेवर आहे. अशातच १० ते २० हॉर्सपॉवरच्या मोटारपंपाद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेला साठा उपसला जात आहे. हा प्रश्न अधिकाºयांकडे मांडण्यात आला आहे.

Web Title: Ghatanji water question fears to become serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी