दारूबंदीसाठी घाटंजीत स्वामिनींचा मोर्चा
By admin | Published: March 28, 2017 01:25 AM2017-03-28T01:25:08+5:302017-03-28T01:25:08+5:30
राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा राज्य शासनाने अवमान केला आहे.
घाटंजी : राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा राज्य शासनाने अवमान केला आहे. पळवाट काढून दारू दुकाने वाचविण्यासाठी केलेला नियम रद्द करून सर्व दारू दुकाने बंद करावी, या मागणीसाठी स्वामिनी दारूबंदी अभियानच्यावतीने घाटंजी येथे सोमवारी मोर्चा काढण्यात आला.
जलाराम मंदिर येथून निघालेला मोर्चा नगरपरिषदेवर धडकला. नगराध्यक्ष नयना ठाकूर यांना निवेदन सादर केले. शहराच्या सीमेंतर्गत नवीन दारू दुकानांना नाहरकत प्रमाणपत्र देवू नये, अशी मागणी यातून करण्यात आली. तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीचे निवेदन ठाणेदारांना देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, यासाठीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. स्वामीनीचे महेश पवार यांनी मोर्चाला संबोधित केले.
या आंदोलनात मनोज राठोड, अनंत कटकोजवार, प्रशांत उगले, गजानन भालेकर, अंकुश ठाकरे, विश्वास निकम, प्रशांत मस्के, वैभव निखाडे, पार्वता भंडारजवार, रवी भोजवार, ललिता राठोड, साधना माडुरवार, मोरेश्वर वातीले, प्रदीप बावने, गणेश उन्नरकर, हर्षल भोयर, चंद्रशेखर नमुलवार, राजेश उदार, रा.वि. नगराळे, अमोल ढगले, उमेश मराठे, सुभाष देवळे, बालाजी कदम, राम आईटवार, विनोद देवतळे, मनोज ढगले, नीलेश चव्हाण, रणजित बोबडे, धनंजय भोरे, शेखर सरकटे, मनीषा काटे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)