गणेशपूरच्या महिलांचा घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:31 PM2018-05-18T22:31:43+5:302018-05-18T22:31:43+5:30
तालुक्यातील गणेशपूर पारधी तांडा येथील महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पंचायत समतीवर घागर मोर्चा काढून धडक दिली. यावेळी महिलांनी प्रचंड रोष व्यक्त करीत घागरी फोडून संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील गणेशपूर पारधी तांडा येथील महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पंचायत समतीवर घागर मोर्चा काढून धडक दिली. यावेळी महिलांनी प्रचंड रोष व्यक्त करीत घागरी फोडून संताप व्यक्त केला.
गणेशपूर पारधी तांडा येथे नियमित पाणीपुरवठा होत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. महिनाभरापासून गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. गावात गंभीर स्थिती असताना ग्रामपंचायत, पंचायत समिती प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी शुक्रवारी पंचायत समितीवर घागर मोर्चा काढला.
मोर्चेकºयांनी प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त करीत सोबत आणलेल्या घागरी फोडल्या. प्रशासनातर्फे सहाय्यक गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढून पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गणेशपूर येथील महिला आणि नागरिक सहभागी झाले होते.