मुलीला पळविले; तीन वर्षे सश्रम कारावास
By admin | Published: June 24, 2017 12:51 AM2017-06-24T00:51:52+5:302017-06-24T00:51:52+5:30
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी आरोपी आशिष गोपाल वानखेडे (२१) रा. लोहारी सावंगा, ता. नरखेड जि. नागपूर
जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी आरोपी आशिष गोपाल वानखेडे (२१) रा. लोहारी सावंगा, ता. नरखेड जि. नागपूर याला कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व ३०० दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवसाचा कारावास, तसेच कलम १२ बाललंैगिक अत्याचार कयद्यांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व २०० दंड आणि दंड न भरल्यास १० दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील अति. सत्र न्यायाधिश शेंडे यांनी शुक्रवारी दिला.
घटनेची थोडक्यात हकीेकत अशी की, २२ आॅगस्ट २०१४ रोजी पीडित ही शासकीय आदिवासी वसतीगृहात मैत्रीन व बहिणीसोबत जात असताना आशिष वानखेडे याने तिला आर्वी बसस्थानकावरून फुस लावून पळून नेले. यावेळी आरोपीने त्याचे नाव अजय उईके असे असल्याचे सांगितले. मात्र त्याचे खरे नाव आशिष वानखेडे असे असल्याचे तपासात समोर आले. आशिष याने पीडितेला विविध ठिकाणी नेत नेले. दरम्यान ४ सप्टेंबर २०१४ रोजी या दोघांना खरांगणा पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सहा. शासकीय अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी शासनातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून मनिष श्रीवास, यांनी साक्षदारांना हजर करून सहकार्य केले. तपासी अधिकारी म्हणून प्रशांत पांडे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे साक्षीपुरावा व युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीस शिक्षा ठोठावली. दोन्ही कलमांतर्गत असलेल्या शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.