मुलींची बाजी : प्रिया बोबडे तालुक्यातून पहिली, गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:19 PM2018-05-30T22:19:46+5:302018-05-30T22:20:01+5:30
बारावीच्या परिक्षेचा तालुक्याचा निकाल ८८.६३ टक्के लागला आहे. या निकालात विद्यार्थीनींनी बाजी मारली. तालुक्यातून पहिली येण्याचा मान मालखेड येथील प्रिया यादव बोबडे हिने पटकाविला. तिने ९०.१५ टक्के गुण घेतले. ती दी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. याच विद्यालयातील कला शाखेची विद्यार्थीनी आशा परवीन सलीम शहा ही ९० टक्के गुण घेत द्वितीय स्थानी राहिली. राणी रमेश इंगळे ही वाणिज्य शाखेत ८७.३८ टक्के गुण घेत तिसरी आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : बारावीच्या परिक्षेचा तालुक्याचा निकाल ८८.६३ टक्के लागला आहे. या निकालात विद्यार्थीनींनी बाजी मारली. तालुक्यातून पहिली येण्याचा मान मालखेड येथील प्रिया यादव बोबडे हिने पटकाविला. तिने ९०.१५ टक्के गुण घेतले. ती दी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. याच विद्यालयातील कला शाखेची विद्यार्थीनी आशा परवीन सलीम शहा ही ९० टक्के गुण घेत द्वितीय स्थानी राहिली. राणी रमेश इंगळे ही वाणिज्य शाखेत ८७.३८ टक्के गुण घेत तिसरी आली.
नेर तालुक्यातून १२६७ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यातील ११२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८४.६५ तर मुलींची ९२.४४ आहे. दी इंग्लिश हायस्कूलचा निकाल ९७ टक्के लागला. बाणगाव येथील रमाई आश्रम शाळेने ९५ टक्के निकाल दिला आहे. चिकणी येथील अनुसया भोयर कला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९३ टक्के लागला. रामदास आठवले कला-विज्ञान महाविद्यालय ९२ टक्के, अंबिका हायस्कूल मांगलादेवी ८५ टक्के, सावित्रीबाई फुले महाविद्यालय नेर ९० टक्के, हरिकमल हायस्कूल खरडगाव ७७ टक्के, वसंतराव नाईक महाविद्यालय कोव्हळा ७३ टक्के, हाजी सत्तार विज्ञान महाविद्यालय नेर ८५ टक्के, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला महाविद्यालय वटफळी ७२ टक्के, नेहरू महाविद्यालय ८४ टक्के तर माणिकवाडा येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालयाचा निकाल ८४ टक्के लागला आहे.
दी इंग्लिश हायस्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य उदय कानतोडे, उपप्राचार्य के.पी. देशमुख, प्रा.किशोर राठोड, प्रा. अरूण नरवडे, प्रा.सुनिल गावंडे, प्रा.अनंत हिरूळकर, प्रा. प्रवीण मिसाळ, प्रा. प्रशांत बुंदे आदींनी सत्कार करून कौतुक केले.
प्रियाचे शिकवणीशिवाय यश
नेर तालुक्यातून पहिली आलेली प्रिया यादव बोबडे हिने कुठल्याही विषयाची शिकवणी न लावता यश मिळविले आहे. तिचे वडील दुधविक्रेते तर आई गृहिणी आहे. स्पर्धा परिक्षेची तयार करून अधिकारी होण्याची मनीषा तिने व्यक्त केली. या दृष्टीने आवश्यक तयारी करणार असल्याची ती म्हणाली.