गारपीटग्रस्तांना ५० हजारांची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:04 PM2018-02-17T22:04:03+5:302018-02-17T22:04:21+5:30

Give 50 thousand assistance to the hailstorm affected people | गारपीटग्रस्तांना ५० हजारांची मदत द्या

गारपीटग्रस्तांना ५० हजारांची मदत द्या

Next
ठळक मुद्देकाँग्रेस कमिटी : संकटाच्या मालिकेने शेतकरी उद्ध्वस्त




लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकºयांना विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. चार दिवसांपूर्वी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटांच्या मालिकेमुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. गारपीटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी निवासी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.
यावर्षीचा अत्यल्प पाऊस, पिकांवर आलेली कीड, कीटकनाशकांमुळे गेलेले शेतकºयांचे बळी, शेती पिकाला नसलेला भाव अशी संकटाची मालिका सुरू आहे. गारपीट व अवकाळी पावसाने उभे पीक जमीनदोस्त झाले. फळबागांचे नुकसान झाले. अशा शेतकºयांना मदत द्यावी, असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना सादर केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्ष मधुरीताई आडे, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष मधुरीताई अराठे, संध्याताई सव्वालाखे, अशोक बोबडे, अरुण राऊत, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर, चंद्रशेखर चौधरी, स्वातीताई येंडे, वैशाली सवाई, दर्शना इंगोले, पल्लविताई रामटेके, अपर्णा चाकोलेवार, अरविंद वाढोणकर, संजय ठाकरे, जितेंद्र मोघे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, सरपंच झुंबरसिंग चव्हाण, विक्की राऊत, सिकंदर शहा, जाफर खान, प्रकाश नवरंगे, अनिल आडे, साहेबराव खडसे, राजा चव्हाण, वसंतराव निरपासे, साजिद बेग, बबलू देशमुख, अरविंद फुटाणे, कौस्तुभ शिर्के, सय्यद इरफान, कृष्णा पुसनाके, अजय किन्हीकर, किशोर चाकोलेवार, जावेद अन्सारी, बबलीभाई, इस्तियाकभाई, अवधूत मस्के, विनायक भेंडे, सदाशिवराव गावंडे, अनिल गाडगे, अनिल जवळगावकर, सुबोध भेले, धनराज चव्हाण, सलीम पटेल आदी उपस्थित होते.

Web Title: Give 50 thousand assistance to the hailstorm affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.