मिसाबंदींना सन्मान वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 09:55 PM2018-05-14T21:55:26+5:302018-05-14T21:55:26+5:30
आणीबाणीतील मिसाबंदी व सत्याग्रही यांना सन्मान वेतन आणि इतर सवलती देण्यात याव्या, यासाठी लोकतंत्र सेनानी संघाच्या नेतृत्वात पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेण्यात आली. पालकमंत्र्यांनी महिनाभरात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आणीबाणीतील मिसाबंदी व सत्याग्रही यांना सन्मान वेतन आणि इतर सवलती देण्यात याव्या, यासाठी लोकतंत्र सेनानी संघाच्या नेतृत्वात पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेण्यात आली. पालकमंत्र्यांनी महिनाभरात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
२५ जून १९७५ ला आणीबाणी लागू झाली. त्या काळातील सत्याग्रही आणि मिसाबंदींना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यात यावी. एसटी आणि रेल्वेचा पास देण्यात यावा. सत्याग्रहींचा गॅझेटमध्ये समावेश करण्यात यावा. सत्याग्रही आणि राजबंदी दिवंगत झाले असल्यास त्यांच्या कुटुंबांना अथवा वारसांना एकरकमी मदत देण्यात यावी. त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष रामराव राजारामजी जाधव, महासचिव अण्णाजी राजेधर, पद्माकर जोशी, क्रांती जोशी, मधुभाऊ देशपांडे, लक्ष्मण खत्री, पांडुरंग झिंजुर्डे आदी उपस्थितीत पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.