नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी द्या, सहकारी संस्थांची मागणी : आंदोलनाचा दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:48 AM2021-09-05T04:48:29+5:302021-09-05T04:48:29+5:30

शुक्रवारी बाजार समितीचे उपसभापती वसंत आसुटकर, यादव काळे यांनी सहकारी संस्थांच्या अध्यक्षांच्या बैठकीचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार ...

Give incentive funds to farmers who repay their loans regularly, demand of co-operative societies: warning of agitation | नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी द्या, सहकारी संस्थांची मागणी : आंदोलनाचा दिला इशारा

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी द्या, सहकारी संस्थांची मागणी : आंदोलनाचा दिला इशारा

Next

शुक्रवारी बाजार समितीचे उपसभापती वसंत आसुटकर, यादव काळे यांनी सहकारी संस्थांच्या अध्यक्षांच्या बैठकीचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे होते. तालुक्यातील नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी कर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षांचा कालावधी होत असताना या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. आज तालुक्यातील २२ सहकारी संस्थांच्या अध्यक्षांनी एक मताने मागणी करीत हे निवेदन दिले. तसेच कर्ज मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख करण्याची मागणी केली. मदत न मिळाल्यास असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला. या बैठकीला रवींद्र धानोरकर, अनंता मांडवकार, गजानन धानोरकर, विलास वासाडे, देवाजी गोहने, प्रफुल विखनकर, भाऊराव पिंपळशेंडे, अशोक चोपणे, दौलत बदखल, संजय येरमे, गणेश पांगुळ, दादाराव टेकाम, वाल्मिक गाडगे, योगेश वद्दे, माया पेंदोर, कवडू चिकटे, सुनील वासाडे, गजानन पंधरे आदी सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते.

Web Title: Give incentive funds to farmers who repay their loans regularly, demand of co-operative societies: warning of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.