वणी ते कोरपना मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:49 AM2021-09-24T04:49:26+5:302021-09-24T04:49:26+5:30

उकणी-बोरगाव रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वणी : तालुक्यातील उकणी ते बोरगावपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सचिन खाडे ...

Give national highway status to Wani to Korpana route | वणी ते कोरपना मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या

वणी ते कोरपना मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या

Next

उकणी-बोरगाव रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

वणी : तालुक्यातील उकणी ते बोरगावपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सचिन खाडे व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपअभियंत्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

उकणीपासून वणीला जाणारा हा एकमेव मार्ग आहे. हा रस्ता वेकोलीच्या उकणी खुल्या खाण क्षेत्रात येत असल्याने या मार्गावरून दररोज ट्रकद्वारे कोळशाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून जागोजागी जिवघेणे खड्डे तयार झाले आहे. त्यात आता पावसाचे पाणी साचून रस्ते चिखलमय बनले आहे. परिणामी अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर या मार्गावरील चेकपोस्टजवळ ट्रकचालक अस्ताव्यस्त ट्रक उभे करून मोकळे होतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर ट्रक उभे राहत असल्याने महिलांना रात्रीचा प्रवास धोकादायक बनला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी चेकपोस्टजवळ अपघात होऊन एकाला आपला जीवसुद्धा गमवावा लागला होता. याबाबत वेकोली प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तसेच पर्यायी रस्त्याचीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा आंदाेलन छेडण्याचा इशारा सरपंच सचिन खाडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

स्वानंद पुंड यांचा गणेशोत्सवात सत्कार

वणी : येथील राम शेवाळकर परिसरात प्रथमच स्थापन केलेल्या गणेशोत्सव मंडळात गणेश तत्त्वज्ञानाचे पंडित विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद पुंड ह्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सपत्नीक भावोत्कट सत्कार माधव सरपटवार यांच्याहस्ते करण्यात आला. प्रा.पुंड यांच्या गाणपत्य संप्रदायातील मौलिक सेवेबद्दल हा औचित्यपूर्ण सत्कार होता. ५२ वर्षीय पुंड यांची ६१ पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झालेली असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. श्री गणेशाच्या आरतीचा एक दिवसीय सन्मानही त्यांना सहकुटुंब सहपरिवार देण्यात आला होता. यावेळी सुधीर साळी, नीलेश कटारिया, तुळशीराम फुलझेले, अटारा, प्रमोद वासेकर, मधुकर भुरचंडी, अनिल चांदवडकर, घोडके, मनोज आकुलवार, भारती सरपटवार, मालती भुरचंडी, वृशाली देशमुख, सुमन जैन, ठाकूर, नंदा कोंडावार, वासेकर, मुजगेवार, सचिन ठाकरे, श्रीवल्लभ सरमोकदम आदी उपस्थित होते.

Web Title: Give national highway status to Wani to Korpana route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.