तामीळनाडूप्रमाणे जुनी पेन्शन द्या
By admin | Published: July 2, 2017 01:28 AM2017-07-02T01:28:14+5:302017-07-02T01:28:14+5:30
जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या तरतूद आहे. मात्र शासन स्वत:च्या सोयीसाठी वेगवेगळे जीआर काढून
शेखर भोयर : शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे अन्नत्याग आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या तरतूद आहे. मात्र शासन स्वत:च्या सोयीसाठी वेगवेगळे जीआर काढून शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहे. तामीळनाडू सरकारप्रमाणेच आता महाराष्ट्र सरकारनेही जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी आग्रही मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केली.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शनिवारी येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन केले. यावेळी आंदोलक शिक्षकांना ते संबोधित करीत होते. शिक्षक महासंघ तसेच जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो डीसीपीएस, एनपीएस धारक शिक्षक कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी परिभाषित पेन्शन योजना सरकारने लागू केली, ती अन्यायकारक आहे. या आंदोलनातील कर्मचाऱ्यांचा बुलंद आवाज शासनापर्यंत पोहोचेलच. आॅक्टोबरमध्ये पेन्शन यात्रा काढून सरकारला जागे करू, असे शेखर भोयर यांनी सांगितले. आंदोलनात शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष नीलेश तायडे, प्रशांत कडूकार, अजय भटकर, जितेंद्र सातपुते, आदेश काळे, कुणाल वानखडे, गुणवंत गांजरे, दरेकर, प्रशांत वानखडे, अजीत काळे, डॉ. इरशाद खान, विनोद मलनस, संजय जगताप, सागर कडू, मुकुंद हामंद, मनोज कडू, अमरावती जिल्हाध्यक्ष मनोज कडू, सचिव मोहन ढोके, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष नदीम पटेल, राज्य प्रतिनिधी मिलिंद सोळंकी, जिल्हा सचिव प्रवीण बहादे, विष्णू राठोड, योगेश मुनेश्वर, प्रकाश खोडे, राजू गोरे, अतुल भगत, प्रवीण गावंडे, बंडू सप्रे, मिलिंद नक्षणे, सुरेंद्र दाभाडकर, संदीप क्षीरसागर, कय्याद काजी आदी सहभागी झाले होते.