पीककर्ज द्या, नाहीतर इच्छामरण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:34 PM2018-05-24T22:34:38+5:302018-05-24T22:34:38+5:30

खरिपाच्या पेरण्या तोंडावर आहेत. तरीही बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाही. यामुळे कर्ज द्या, नाही तर इच्छामरण द्या, अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी वारकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Give a peak loan, otherwise sacrifice it | पीककर्ज द्या, नाहीतर इच्छामरण द्या

पीककर्ज द्या, नाहीतर इच्छामरण द्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शेतकरी वारकरी संघटनेचे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खरिपाच्या पेरण्या तोंडावर आहेत. तरीही बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाही. यामुळे कर्ज द्या, नाही तर इच्छामरण द्या, अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी वारकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
स्थानिक तिरंगा चौकामध्ये गुरूवारी शेतकरी वारकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी येत्या १५ दिवसांत पीक कर्ज देण्याची मागणी केली. कर्ज न मिळाल्यास ईच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सततची नापिकी, दुष्काळ, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे कर्ज थकले. यातून बाहेर पडण्यासाठी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी एक दिवसाचे धरणे दिले आहे. या आंदोलनात शेतकरी वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिकंदर शाह, मनिष पाटील, अनुप चव्हाण, दराटे महाराज, अनिल पवार, प्रशांत वानखडे, डॉ.बबन बोंबले, नीलेश चव्हाण, चंद्रशेखर चौधरी, अजय किन्हिकर, वर्षा निकम, पल्लवी रामटेके यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Give a peak loan, otherwise sacrifice it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी