विद्यार्थ्यांच्या हाती झेंड्यापेक्षा अजेंडा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:26 PM2018-01-19T23:26:45+5:302018-01-19T23:28:07+5:30
विद्यार्थ्यांच्या हाती जात, धर्म वा कुण्या राजकीय पक्षाचा झेंडा देण्यापेक्षा अजेंडा द्या, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत गावंडे यांनी येथे केले. येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : विद्यार्थ्यांच्या हाती जात, धर्म वा कुण्या राजकीय पक्षाचा झेंडा देण्यापेक्षा अजेंडा द्या, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत गावंडे यांनी येथे केले.
येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष नामदेव ससाने, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सूर्यवंशी, अॅड. संतोष जैन, उपशिक्षणाधिकारी अशोक रोहणे, देविदास डंभे, गटशिक्षणाधिकारी सचिन खुडे, नगरपरिषद शिक्षण सभापती राजेंद्र ठाकरे, प्राचार्य डॉ. एम.एन. गायकवाड, निता गावंडे, अनिल शेंडगे, दत्तराव शिंदे, डॉ. विठ्ठल चव्हाण, रेणुराव पाटील, विनोद संगीतराव, विजय विसपुते, सतीश काळे, अनिल कदम, प्रमोद देशमुख, सरोज देशमुख, मनीष काळेश्वरकर, सारिका शिंदे, वंदना वानखडे आदी उपस्थित होते. उद्घाटन रिमोटच्या सहाय्याने दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शाम पंचभाई यांचा सत्कार करण्यात आला. संचालन एस.व्ही. स्वामी व चंद्रकांत ठेंगे यांनी तर आभार देविदास डंभे यांनी मानले.