विषबाधितांना दहा लाखांची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 10:57 PM2017-10-13T22:57:21+5:302017-10-13T22:57:37+5:30
मुंबई येथे चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना देण्यात आलेल्या मदतीएवढीच मदत विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना द्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : मुंबई येथे चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना देण्यात आलेल्या मदतीएवढीच मदत विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना द्यावी, अशी मागणी बंजारा क्रांती दलाच्यावतीने दिग्रस तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून १९ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. राजकीय नेते येऊन केवळ सांत्वना करीत आहे. शासनाने मृतांना दोन लाखांची मदत जाहीर केली. परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. मुंबई दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये आणि जगाचा पोशिंदा शेतकरी विषबाधित दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये हा दुजाभाव नाही का असा सवाल या निवेदनात करण्यात आला आहे. तहसीलदारांना निवेदन देताना बंजारा क्रांती दलाचे प्रदेश युवा सरचिटणीस मनोहर राठोड, नामदेव पवार, लक्ष्मण चव्हाण, यादव पवार, सुधीर राठोड आदी उपस्थित होते.