मुलांना मतप्रदर्शन करण्याची संधी द्या

By admin | Published: February 23, 2017 01:04 AM2017-02-23T01:04:21+5:302017-02-23T01:04:21+5:30

मुलांपुढे अशी परिस्थिती निर्माण करून ठेवा जेणेकरून ते आपले मत प्रदर्शित करतील. त्यांना संधी दिल्या गेली

Give your children an opportunity to demonstrate | मुलांना मतप्रदर्शन करण्याची संधी द्या

मुलांना मतप्रदर्शन करण्याची संधी द्या

Next

शांतीलाल मुथ्था : पिंपळखुटा येथे मूल्यवर्धन आढावा सभा
बाभूळगाव : मुलांपुढे अशी परिस्थिती निर्माण करून ठेवा जेणेकरून ते आपले मत प्रदर्शित करतील. त्यांना संधी दिल्या गेली तर ते आपल्या बुद्धीचा चांगला वापर करतात, असे प्रतिपादन शांतीलालजी मुथ्था फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलालजी मुथ्था यांनी केले.
पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेत मूल्यवर्धन आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, सतीश नागपुरे, गटशिक्षणाधिकारी मधुसुदन बांडे, नरेश पवार, सरपंच सुधाकर ओकटे, नारायण सराडकर, एकनाथ मंडपधरे, पुंडलिकराव चंदनखेडे आदी उपस्थित होते. मूल्यवर्धन शिक्षणामुळे मुलांमध्ये झालेल्या अपेक्षित वर्तन बदलाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. याप्रसंगी डॉ. सुचिता पाटेकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १०० मुले पुणे येथील वाघोली प्रकल्पात शिक्षण घेत आहेत. लातूरचा भूकंप झाला तेथून एक हजार मुलांना पुण्यात शिक्षणासाठी आणले. जबलपूरमधूनही मुलांना पुण्याला आणले गेले. जम्मू काश्मीरमधून ५०० मुस्लीम मुलांना पुण्याला शिकायला आणले. गुजरातमध्ये ३६८ शाळा बांधून एक लाख २० हजार मुलांना पुण्यात शाळेत बसविण्यात आले, अशी माहिती शांतीलालजी मुथ्था यांनी यावेळी दिली. याप्रसंगी अखिल भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय सदस्य महेंद्रभाईजी सुराणा, राज्याध्यक्ष अमरबाबू गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशचंद छाजेड, सुदर्शनजी गांग, विजय गुगलिया, प्रदीप जैन, सुभाष आचलिया, सुदर्शन जैन, प्रशांत मस्के, मुख्याध्यापक नितीन मोरे, राजेंद्र बंगरूड, शैलेश गोरडे, प्रशांत खेडकर, वसंत लांजेवार, गौतम आहटे, कुशल समरित, शिल्पा केवटे, दिलीप भाकरे, मारोती इरपाते, श्रद्धा कन्नाके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Give your children an opportunity to demonstrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.