सायकलवीराचा केला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:45 AM2021-09-18T04:45:22+5:302021-09-18T04:45:22+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद होते. राजेश कोटलवार, श्रीकांत सरनाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्कारमूर्ती ...

Glory to the cyclist | सायकलवीराचा केला गौरव

सायकलवीराचा केला गौरव

Next

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद होते. राजेश कोटलवार, श्रीकांत सरनाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्कारमूर्ती अनंत जाधव यांनी मनाली, लेह, लडाख, खारडूंग या जगातील सर्वांत उंच १७ हजार ९८२ फूट रोडवर ५२० किलोमीटर सायकलिंग पूर्ण केली. त्यांना शाल, श्रीफळ, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जाधव यांनी मनाली ते लेह व लडाख ५२० किलोमीटर प्रवासाचे चित्तथरारक वर्णन केले.

शरद मैंद यांनी पुसदवासीयांनी सायकलिंगसोबत नियमित व्यायाम करून आरोग्य चांगले ठेवावे, असे आवाहन केले. वंदे मातरम् सायकल क्लबचे प्रमुख प्रा. अजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले, तर अमित बोजेवार यांनी सूत्रसंचालन केले. बाळकृष्ण मंदाडे यांनी आभार मानले. अनिल क्षीरसागर, अजय कोटलवार, प्रमोद डंबोळे, अमर नुराई, प्रशांत लासीनकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक भाऊ बोके, उपमुख्यध्यापक धनवे, वैभव फुके, कौस्तुभ धुमाळे, चंद्रकांत ठेंगे, विजय पाटील, ॲड. महेश निर्मल, प्रा. रामटेके, प्रा. अजय राठोड, अविनाश खापरे, दीपक मेश्राम, अविनाश कराळे, अमर शर्मा, मनोज काळे, जगदीश जाधव, वंदे मातरम् क्लबचे सदस्य, कोषटवार शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Glory to the cyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.