दिग्रसमध्ये शिक्षकाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:26 AM2021-07-12T04:26:20+5:302021-07-12T04:26:20+5:30

कांबळे यांनी तब्बल ३० वर्षे सीमेवर राहून देशसेवा केली. त्यानंतर ते ईश्वर देशमुख सैनिक शाळेत प्रशिक्षण निर्देशक पदावर रुजू ...

The glory of the teacher in Digras | दिग्रसमध्ये शिक्षकाचा गौरव

दिग्रसमध्ये शिक्षकाचा गौरव

googlenewsNext

कांबळे यांनी तब्बल ३० वर्षे सीमेवर राहून देशसेवा केली. त्यानंतर ते ईश्वर देशमुख सैनिक शाळेत प्रशिक्षण निर्देशक पदावर रुजू झाले. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी सैनिक शाळेत शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण दिले. त्यांचे अनेक विद्यार्थी गणराज्य दिनानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या परेडमध्ये उत्कृष्ट संचलन करीत होते. विद्यार्थ्यांच्या मनात देशसेवेची भावना निर्माण व्हावी, याकरिता ते अविरत कार्यरत आहेत.

त्यांच्या या कार्याचा गौरव करण्याकरिता संस्थेचे संस्थापक, माजी राज्यमंत्री संजय देशमुख तथा संस्थेच्या सचिव वैशाली देशमुख यांनी गौरव समारंभ घेतला. कांबळे यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. प्राचार्य नितीन धनवंत यांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्निक सन्मान केला. अध्यक्षस्थानी अली होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ लाचुरे, ताई खंडारे उपस्थित होत्या. अनेक शिक्षकांनी भावना व्यक्त केल्या. संचालन कपिल बोरुंदिया यांनी केले.

Web Title: The glory of the teacher in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.