यवतमाळ ‘मेडिकल’मध्ये शवविच्छेदनगृहाचा गोवा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 09:35 PM2018-08-08T21:35:01+5:302018-08-08T21:36:21+5:30

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहाची स्वतंत्र नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी गोवा येथील इमारतीच्या संकल्पनेचा आधार घेतला जाणार आहे. येथील कामाची गती वाढण्यासाठी अत्याधुनिका यंत्रणेचा उपयोग केला जाणार आहे.

Goa pattern of post mortem in Yavatmal Medical College | यवतमाळ ‘मेडिकल’मध्ये शवविच्छेदनगृहाचा गोवा पॅटर्न

यवतमाळ ‘मेडिकल’मध्ये शवविच्छेदनगृहाचा गोवा पॅटर्न

Next
ठळक मुद्देबांधकामाला सुरुवात : मृतदेहांसाठी अद्ययावत फ्रिजर रूम

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहाची स्वतंत्र नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी गोवा येथील इमारतीच्या संकल्पनेचा आधार घेतला जाणार आहे. येथील कामाची गती वाढण्यासाठी अत्याधुनिका यंत्रणेचा उपयोग केला जाणार आहे.
मेडिकल मध्ये असलेल्या शवविच्छदेन गृहात आज अनेक समस्या आहेत. अनेकदा येथील फिज्ररमध्ये बिघाड येतो, लोडशेडींगचा फटका येथील चिलिंग युनिटला बसतो. या अडचणी सोडविण्यासाठी नवीन शवविच्छदन गृह तयार केले जात आहे. या इमारतीमध्ये ट्रे व फ्रिजरमध्ये मृतदेह ठेवण्याऐवजी स्वतंत्र शितगृहच तयार केले जाणार आहे. यामध्ये एकाच वेळी ५० च्या वर मृतदेह ठेवण्याची सोय केली जाणार आहे. शिवाय शवविच्छेदन कक्षातही अत्याधुनिक टेबलसह साधनसामुग्री दिली जाईल.
येथे डॉक्टर, स्वीपर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी विश्राम कक्ष राहणार आहे. प्रकाश व्यवस्था दर्जेदार करणार आहे. इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रिगिरीवार यांनी गोवा येथील शवविच्छेदन गृहाची पाहणी केली होती. त्याच धरतीवर यवतमाळ मेडिकल मध्ये नवीन इमारत बांधली जात आहे.
दर्जा सुधारणार
अमरावती परिक्षेत्रात कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने अनेकदा शवविच्छेदनासाठी यवतमाळ न्याय वैद्यकशास्त्र विभागाकडे आणले जाते. त्यामुळे अस्तित्वात असलेले शवविच्छेदनगृह लहान पडत होते.

Web Title: Goa pattern of post mortem in Yavatmal Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.