गोरबंजारा न्याय हक्क समितीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 09:41 PM2017-12-26T21:41:28+5:302017-12-26T21:41:54+5:30
गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करण्यासह संपूर्ण राज्यात संरक्षण आणि तेलंगणात या समाजाच्या विरोधात हिंसाचार घडविणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करण्यासह संपूर्ण राज्यात संरक्षण आणि तेलंगणात या समाजाच्या विरोधात हिंसाचार घडविणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन केली आहे. अखिल भारतीय गोरबंजारा संवैधानिक न्याय हक्क महासमितीने निवेदन सादर केले.
प्रांतरचना करताना, सामाजिक आरक्षण देताना आणि संवैधानिक मानवाधिकार प्रदान करताना हा समाज वंचित राहिला आहे. संपूर्ण भारतात ४४ वेगवेगळ्या नावांनी गोरबंजारा हा समाज ओळखला जातो. एक समूह, एक भाषा, एक भूषा, एक संस्कृती असणारा हा समाज वेगवेगळ्या राज्यात विखुरला गेला आहे. वेगवेगळ्या नावाने विभिन्न प्रवर्गात टाकण्यात आला आहे. मात्र आज हा समूह आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे.
अनुसूचित जमातीच्या सवलती या समाजाला मिळू नये यासाठी १५ डिसेंबर रोजी तेलंगणा राज्यात आकसापोटी हिंसाचार घडवून आणला गेला. गोरबंजारा समाजाचे लोक या प्रकारात मृत्यूमुखी पडले. अनेकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. हा सर्व प्रकार करणाºयांविरूद्ध तत्काळ कारवाई करावी, यासह समाजाच्या इतर मागण्यांचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी बंजारा समाजातील विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.