तांडा सुधार समितीतर्फे सुवर्णपदक विजेती प्रियंकाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:44 AM2021-05-06T04:44:23+5:302021-05-06T04:44:23+5:30
तिचा ऑनलाइन सत्कार करून ५००१ रुपयांची भेट दिली. येथील सहकारी प्रा. विजय राठोड व दिनेश राठोड यांना तिच्या घरी ...
तिचा ऑनलाइन सत्कार करून ५००१ रुपयांची भेट दिली. येथील सहकारी प्रा. विजय राठोड व दिनेश राठोड यांना तिच्या घरी पाठवून तिचे कौतुक करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या विषयावर तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा व महाज्योतीचे संचालक दिवाकर घमे यांनी विविध योजनांची माहिती दिली.
खिमेश बढिये यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. नामा बंजारा यांनी विमुक्त भटक्या समाजातील मुलांच्या रक्तात निसर्गतःच खेळ भिनलेला असून त्याच्या वाढीसाठी महाज्योतीने योजना राबवायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आर्थिक पाठबळ नसताना छोट्याशा गावात राहणाऱ्या प्रियंकाने सुवर्णपदक पटकाविले आणि समाजाची मान उंच केली. त्याबद्दल नामा बंजारा यांनी तिचे कौतुक केले. कार्यक्रमाला डॉ. प्रकाश राठोड, प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय जाधव, डॉ. रमेश राठोड, श्रीपत राठोड, दत्ता पवार, पी.के. पवार, सुभाष चव्हाण, कविता राठोड, विलास जाधव, श्रावण जाधव, सरदार राठोड, ताराचंद चव्हाण, धोटू चव्हाण, उपस्थित होते. संचालन अनिल जाधव, तर आभार अनिल राठोड यांनी मानले.