सोनखासच्या विद्यार्थ्यांची वनयात्रा

By admin | Published: March 23, 2017 12:19 AM2017-03-23T00:19:11+5:302017-03-23T00:19:11+5:30

आंतरराष्ट्रीय वनदिनानिमित्त सोनखास येथील शालेय विद्यार्थ्यांची वनसफर घडविण्यात आली.

Gold Toys Students | सोनखासच्या विद्यार्थ्यांची वनयात्रा

सोनखासच्या विद्यार्थ्यांची वनयात्रा

Next

सफरीचा आनंद : वनदिनी जाणले वृक्षांचे महत्त्व
नेर : आंतरराष्ट्रीय वनदिनानिमित्त सोनखास येथील शालेय विद्यार्थ्यांची वनसफर घडविण्यात आली. सोनखास हेटी येथील जंगलात या विद्यार्थ्यांची वनयात्रा काढून विविध प्रकारच्या वृक्षांची ओळख करून देण्यात आली. सोबतच त्याचे महत्त्व पटवून दिले.
उपविभागीय वनअधिकारी एस.व्ही. भेदरकर यांनी मार्गदर्शन केले. वृक्ष संरक्षणाची जबाबदारी वनविभागाची असली तरी प्रत्येकाने हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. आयुर्वेदात वृक्षसंपदा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते, असे ते म्हणाले. यावेळी नेर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड, कुशल रंगारी, शेखर साठे, आर.पी. डेहनकर, एम.एस. शेख, हेमंत कोटनाके, वैशाली स्थूल, संतोष अरसोड, गणेश राऊत, अशोक इसाळकर, पांडुरंग भोयर, गजानन काळे, संकेत सदावर्ते आदी उपस्थित होते.
जंगलाला लागणाऱ्या आगीची कारणे, आरोग्यासाठी कंदमुळाचा होत असलेला उपयोग, वाघाला दाट जंगलाची असलेली गरज, सिंहाचा मोकळ्या अरण्यात असलेला संचार आदी बाबी या वनयात्रेत विशद करण्यात आल्या. या जंगलामध्ये बिबटासह विविध वन्यजीव असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रोज सूर्याचा होणारा बदल, शनी ग्रहाची स्थिती याचे चित्रिकरण एस.व्ही. भेदरकर यांनी दाखविले.
या उपक्रमासाठी पी.बी. खंदारे, नितीन बिजवार, महालक्ष्मी कापडे, स्वाती अघम, वैशाली चिलमकार, प्रिया राऊत, पंकज ताठे, महेश भोयर, अशोक कदम, वसंत भोयर, आर.एन. कठाडे यांच्यासह सोनखास येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, वनसमितीचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gold Toys Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.