कशाचे अच्छे दिन? इथे हाताला काम नाही, राशनही भेटत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 05:00 AM2022-02-09T05:00:00+5:302022-02-09T05:00:32+5:30

आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. 

Good day for what There is no work here, no rations! | कशाचे अच्छे दिन? इथे हाताला काम नाही, राशनही भेटत नाही!

कशाचे अच्छे दिन? इथे हाताला काम नाही, राशनही भेटत नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आमच्याकडे हाताला काम नाही, पोटभर भाकर नाही अशी सगळी परिस्थिती आहे. आम्ही स्वत: काम करतो, घरच्या बायका-पोरं भिक्षा मागतात. काहीजण लोखंड गोळा करतात. यानंतरही पोटभर अन्न मिळत नाही. अशी सगळी अवस्था आहे. कशाचे अच्छे दिन आले, आमचे तर वाईटच दिवस. 
आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. 
किमान हाताला काम असले तर माणसाला चिंता राहत नाही. मात्र कामावर गेल्यावर दोन दिवस हाताला काम लागते, इतर दिवस प्रतीक्षाच करावी लागते. यामुळे आमची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. पोरांना शाळेतून मिळणारे तांदूळही बंद झाले. स्काॅलरशिपचे पैसेही येत नाही. लाॅकडाऊनने तर पोरं कोणत्या वर्गात गेले, हेपण कळले नाही. 

आठवड्यात ४०० रुपये हातात  

आमच्या कुटुंबात सात लोक आहे. चार पोरी, एक पोरगा आणि आम्ही दोघं असा सगळा परिवार आहे. दोन दिवस माझ्या मजुरीचे पैसे येतात, इतर दिवस घरची मंडळी भिक्षा मागून पैसे गोळा करतात. 
        - किरण हातागडे 

मला १२ वर्षं झाले. मी आजही मागूनच खात आहे. माझे पती काम करीत नाही. सगळे काम माझ्याकडेच आहे. कुणी मजुरी देत नाही. यामुळे भिक्षा मागावी लागते. यावरच कुटुंब चालते आहे.     
- कविता रवी नाडे 

आम्ही भंगार विकून जे काही पैसे येतील, त्यातच कुटुंब चालविण्याचा प्रयत्न करतो. घरातील सगळे जण भंगार वेचण्यासाठी सकाळपासूनच जातात. हाताला मजुरी भेटत नाही. भंगारातून जी काही रक्कम जमा होईल, त्यातच राशनपाणी विकत आणावे लागते. आम्हाला मोफतचे धान्य आणि रेशन दुकानातील धान्य अजूनपर्यंत मिळालेले नाही. कुठलेही घरदार नाही. खुल्या मैदानात झोपड्या बांधून आम्ही राहतो आहे. नालीच्या बांधकामात आमचे घर तुटले. तेव्हापासून परिवार उघड्यावर आला आहे.     - सुनील गोकुळ हातागडे

मजुरांच्या अडचणी काय
कामगार चौकात सकाळी शेकडो मजूर उभे असतात. यातील मोजक्याच मजुरांच्या हाताला काम मिळते. यामुळे कामावर डबे घेऊन पोहोचलेल्या मजुराला काम न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. अनेकजण याच ठिकाणी बसून काम मिळण्याची प्रतीक्षा करतात.

काम मिळाले तरच किराणा
आठवड्यात दोन ते तीन दिवस काम मिळते. इतर दिवस मात्र इतर ठिकाणी फिरून मजुरी कमवावी लागते. मात्र मजुरी नसेल तर किराणा कुठून आणायचा, हाही प्रश्न आहे. शिवाय अनेकांना रेशन दुकानातील धान्यही मिळत नाही. अनेकांचे नवीन रेशनचे पुस्तकही विभागातून गहाळ झाले. 

बायका-पोरं भीक्षा आणि भंगारावर जगतात
हाताला दोन दिवसच काम मिळत असल्याने इतर दिवशी काय करायचे, हा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत घरातील लहान, मोठ्यांसह सगळे जण गावभर फिरून भीक्षा गोळा करतात, तर काही जण भंगार जमा करून ते विकतात. यातून हातात पडलेल्या पैशातून आवश्यक वस्तू खरेदी केल्या जातात. पैसे नसतील तर कामही बाकी राहते.

 

Web Title: Good day for what There is no work here, no rations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.