विद्यार्थ्यांनो खूशखबर ! आता शाळेत न्या एकच पुस्तक !! यंदा दप्तर ७५ टक्के होणार हलके; पहिली ते आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू

By अविनाश साबापुरे | Published: April 21, 2023 07:35 AM2023-04-21T07:35:54+5:302023-04-21T07:36:36+5:30

Education: पाठीवर दप्तराचे ओझे वाहून थकलेल्या बच्चेकंपनीसाठी  खूशखबर आहे. आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर त्यांच्या दप्तराचे वजन ७५ टक्के हलके होणार आहे.

Good news students! Now take only one book to school!! This year the office will be 75 percent lighter; Printing of integrated textbooks for classes 1st to 8th has started | विद्यार्थ्यांनो खूशखबर ! आता शाळेत न्या एकच पुस्तक !! यंदा दप्तर ७५ टक्के होणार हलके; पहिली ते आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू

विद्यार्थ्यांनो खूशखबर ! आता शाळेत न्या एकच पुस्तक !! यंदा दप्तर ७५ टक्के होणार हलके; पहिली ते आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू

googlenewsNext

- अविनाश साबापुरे 
यवतमाळ : पाठीवर दप्तराचे ओझे वाहून थकलेल्या बच्चेकंपनीसाठी  खूशखबर आहे. आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर त्यांच्या दप्तराचे वजन ७५ टक्के हलके होणार आहे. कारण यापूर्वी केवळ पहिल्या वर्गासाठी लागू केलेली ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक’ योजना आता पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी लागू होणार आहे. त्यामुळे सर्व जिल्हा स्तरावरून यंदा दरवर्षीपेक्षा केवळ २५ टक्के पुस्तक संचांची मागणी बालभारतीने नोंदवून घेतली असून, छपाईचे कामही सुरू करण्यात आले आहे. 

उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५, तर विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 
केले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्राच्या तयारीसाठी शिक्षण विभागातील यंत्रणा कामाला  लागली आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) दरवर्षीप्रमाणे यंदाही समग्र शिक्षा अभियानातून  मोफत पाठ्यपुस्तक वितरणासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच जिल्ह्यांतून पुस्तकांची मागणी नोंदवून छपाई सुरू करण्यात आली आहे.   

आधीच झाली सुरुवात 
n वास्तविक बालभारतीने २०२० पासूनच दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे काम हाती घेतले. मात्र पहिल्या वर्षी केवळ राज्यातील ५० तालुक्यांमध्ये पहिल्या वर्गासाठी ही पुस्तके देण्यात आली. 
n आता २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी व संपूर्ण राज्यातील शाळांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तके वापरली जाणार आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे हलके होणार आहे.  

असे असेल वर्गनिहाय एकात्मिक पुस्तक 
n वर्ग व एकाच पुस्तकात 
समाविष्ट विषय
n पहिली व दुसरी : मराठी, इंग्रजी, गणित, खेळू-करू-शिकू
n तिसरी व चौथी : मराठी, 
इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास 
n पाचवी : मराठी, इंग्रजी, 
गणित, परिसर अभ्यास 
n सहावी व सातवी : मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र 
n आठवी : मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल

Web Title: Good news students! Now take only one book to school!! This year the office will be 75 percent lighter; Printing of integrated textbooks for classes 1st to 8th has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.