कृषी कायद्याच्या विरोधात यवतमाळच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:01 PM2020-12-08T15:01:05+5:302020-12-08T15:01:29+5:30
Yawatmal News Bharat band कृषी कायद्याविरोधात यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृषी कायद्याविरोधात यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यवतमाळ शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे, दुकाने बंद करण्यासाठी कार्यकर्ते बाजार पेठेत फिरत आहेत.
आज भारत बंद च्या पार्श्वभुमीवर चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील बाजारपेठ सकाळपासूनच सर्व व्यापा?्यांकडून बंद ठेवण्यात आली. तसेच गावांत असलेले विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सुध्दा बंद ठेवण्यात आले.यामधे माजी पंचायत समिती श्री प्रमोद भगत भेंडाळा गावचे पोलिस पाटील श्रीरंग मशाखेत्री, सामजिक कार्यकर्ते श्री प्रमोद सहारे, प्रमोद डांगे, साईनाथ चुदरी, खुशाल सातपुते , घनश्याम चलाख, रवी चलाख , नोमाजी सातपुते , रतन मशाखेत्री, प्रमोद गोरलावर, किशोर जंगमावर मिळून आज भेंडाळा 100% बंद पाळण्यात आला