पाणीटंचाईच्या नावानं गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 09:56 PM2018-05-23T21:56:43+5:302018-05-23T21:56:43+5:30

संपूर्ण यवतमाळ शहर भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. अशा स्थितीत काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. गोरगरीब कुटुंब पाणी विकत घेऊ शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी आम्ही झटतोय, असा देखावा करून बकळ अशी लोकवर्गणी दात्यांकडून जमा केली जात आहे.

Gorakhadhanda in the name of water shortage | पाणीटंचाईच्या नावानं गोरखधंदा

पाणीटंचाईच्या नावानं गोरखधंदा

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन फंडा : अंधार होताच टँकरवर लागतात बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहर भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. अशा स्थितीत काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. गोरगरीब कुटुंब पाणी विकत घेऊ शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी आम्ही झटतोय, असा देखावा करून बकळ अशी लोकवर्गणी दात्यांकडून जमा केली जात आहे. टंचाई वेगवेगळ्या पद्धतीने कॅश करण्याचा नवीन फंडा काहींनी शोधला आहे.
पाणी हे जीवन आहे. त्याचं दान करून पुण्य कमावण्यासाठी अनेकजण दातृत्वाचा भाव घेवून झटत आहे. काहींनी तर या टंचाईतही स्वत:कडे असलेले पाण्याचे साठे मोफत उपलब्ध करून दिले आहे. शक्य होईल तेवढ्यांना पाणी पुरविण्याची जबाबदारी माणुसकी म्हणून केली जात आहे. मात्र यालाही अपवाद ठरणारे महाभाग टाळूवरचं लोणी खाण्याच्या मानसिकतेतून पाणीटंचाईत स्वत:ची चांदी कशी होईल यासाठी व्यूहरचना आखत आहे. यामध्ये सामाजिक समतेचा डांगोरा पिटणारे तसेच लोकनेता असलेल्याचे भासविणारे काही नगरसेवकही समाविष्ट आहे. पालिकेकडून मिळालेले टँकर फिरल्यानंतर रात्री त्यावर स्वत:च्या नावाचे फलक लावून पाण्याचे वाटप केले जाते. काही ठिकाणी तर परस्परच शासकीय खर्चाने भरलेल्या टँकरची रोखीत विक्री केली जाते. हा गोरखधंदा सध्या जोरात असून गोरगरीबांच्या पाण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात चंदा वसूल केला जात आहे.
नगरपरिषदेच्या पाण्याचे स्त्रोत झपाट्याने कोरडे पडत असले तरी बांधकामासाठी विशिष्ट वेळेनंतर टँकर भरून त्याची विक्री केली जात आहे. यासाठी एक टोळके सक्रिय झाले असून टंचाईच्या काळात स्वत:ची झोळी भरण्यात मग्न आहेत. अशा संधीसाधूमुळे प्रामाणिकपणे काम करणारा कर्मचारीवर्ग, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो. टंचाईने सर्वच जण तणावग्रस्त असून मानापमान सहन करून अनेक घटक सेवा देण्यात व्यस्त आहेत. दुर्दैवाने त्यांच्या भरोशावर दुकानदारी करणारे पैसा गोळा करताना दिसत आहे.

Web Title: Gorakhadhanda in the name of water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.