सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

By admin | Published: April 16, 2016 01:55 AM2016-04-16T01:55:47+5:302016-04-16T01:55:47+5:30

नैसगिक आपत्तीत शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता येणाऱ्या संकटाचा सामना धिराने करावा, सरकार आपल्या पाठीशी आहे,

Government Back to Farmers | सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

Next

किशोर तिवारी : मुळावा येथे ‘सरकार आपल्या दारी’
मुळावा : नैसगिक आपत्तीत शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता येणाऱ्या संकटाचा सामना धिराने करावा, सरकार आपल्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे केले.
उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे सरकार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनसुनावणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किशोर तिवारी यांनी महसूल, कृषी, ग्रामविकास, महावितरण, पोलीस, आरोग्य, शिक्षण विभागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच आदिवासी शेतकरी, शेतमजूर विधवांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंडितराव पांगरकर यांनी इसापूर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची मागणी केली. तिवारी यांनी माहिती घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन केले. तसेच कोणतेही समस्या आल्यास माझ्याशी संपर्क साधा असेही सांगितले.
कार्यक्रमात राम पाठक, रामराव जामकर, मंचकराव कदम, कुमार कानडे, रमेश शिंदे, अविनाश कदम आदींनी समस्या मांडल्या. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दीपक सिंघला, तहसीलदार भगवान कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता टेकाळे, वीज वितरणचे उपअभियंता राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, गटविकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पवार, पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, दुय्यम निबंधक पी.डी. दहीवाळ, ग्रामसेवक एस.पी. बोंडे, टी.एस. माने, के.डी. बारकड, तलाठी जनार्दन सावळकर, मंडल अधिकारी राजेंद्र मून, शहाजी खडसे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Government Back to Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.