शासनाची दीड लाखांची कर्जमाफी नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:22 PM2018-07-02T22:22:17+5:302018-07-02T22:22:38+5:30

छत्रपती शिवाजी महराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात दीड लाखाच्या आतील कर्ज अंशत: माफ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.

The government's debt waiver of 1.5 lakh | शासनाची दीड लाखांची कर्जमाफी नावालाच

शासनाची दीड लाखांची कर्जमाफी नावालाच

Next
ठळक मुद्देअंशत: माफी : वन टाईम सेटलमेंटमध्ये शेतकरी अडकले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : छत्रपती शिवाजी महराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात दीड लाखाच्या आतील कर्ज अंशत: माफ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.
जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आॅनलाईन कर्जमाफी अर्ज भरल्यानंतर त्यांना दीड लाखापर्यंतचे सर्व कर्ज माफ केले जाणार होते. तशी घोषणा सरकारने केली होती. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. प्रत्यक्षात दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज अद्याप माफ झाले नाही. त्यांचे अंशत: कर्ज माफ झाले. उर्वरित रक्कम त्यांच्याकडे बाकीच आहे. या शेतकऱ्यांना आता नव्याने कर्जही मिळाले नाही. आजही हे शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.
यासोबतच ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेत दीड लाखांवरील रक्कम भरल्यानंतर शेतकºयांना दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. काही शेतकऱ्यांनी दीड लाखावरील रक्कम भरल्यानंतर त्यांना आपण कर्जमाफीला पात्र नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचाही प्रचंड हिरमोड झाला आहे. परिणामी ही कर्जमाफी फसवी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.
शेतकरी झिजवताहेत बँकांचे उंबरठे
कर्जमाफीनंतरही अनेक शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळाले नाही. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा आहे. कर्जासाठी दररोज हजारो शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवित आहे. सर्वच बँकांच्या जिल्ह्यातील शाखांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. कर्जमाफीची ग्रीन यादी विविध तांत्रिक कारणामुळे रखडली आहे. ग्रीन यादीअभावी जिल्ह्यातील तब्बल ६८ हजार शेतकरी अद्यापही कर्जापासून मुक्त झाले नाही. त्यांच्या सातबाऱ्यांवर कर्ज असल्याने नवीन कर्ज मिळणे कठीण झाले आहे. खरीपाची पेरणी आटोपण्याच्या मार्गावर असतानाही शेतकऱ्यांच्या हातात दमडी पडली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना नाईलाजास्तव सावकाराच्या दारात उभे रहावे लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.

Web Title: The government's debt waiver of 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.