VIDEO : गुराखी नासीर विजयी झाला अन् आनंदोत्सवात मित्रांनी केला दुग्धाभिषेक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:28 PM2021-01-19T21:28:21+5:302021-01-19T21:33:14+5:30
Gram panchayat Election Result : धनज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गमतीजमतीसह चुरसही पाहायला मिळाली. या ठिकाणी शिवसेनेला पहिल्यांदाच नऊपैकी नऊ जागांवर विजय मिळाला.
नेर (यवतमाळ) : अतिशय गरीब कुटुंबातील अन् गुरे चारणारा मित्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाल्याचा आनंद मित्रांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याला चक्क दुग्धाभिषेक घालण्यात आला. तालुक्याच्या धनज येथे झालेल्या या जल्लोषाने विजयी उमेदवार नासिरही आनंदून गेला.
धनज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गमतीजमतीसह चुरसही पाहायला मिळाली. या ठिकाणी शिवसेनेला पहिल्यांदाच नऊपैकी नऊ जागांवर विजय मिळाला. वॉर्ड क्रमांक एकमध्ये सहा उमेदवार रिंगणात होते. यातील सर्वात गरीब गुरे चारणारा नासिर मिर्झा विजयी झाला. या विजयाचा आनंद इस्राइल पठाण व मित्रपरिवाराने नासिर बेग याचा चक्क दुधाने अभिषेक करत साजरा केला. शिवसेनेच्या पॅनलकडून नासिर निवडून आला आहे. तो एका खाजगी वाहनावर चालक म्हणूनही काम करतो. जनावरेही चारतो. अनोख्या पद्धतीने आनंद साजरा झाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
यवतमाळ : गुराखी नासीर विजयी झाला, मित्रांनी दुग्धाभिषेक केला; धनजमध्ये अनोखा आनंदोत्सव#Grampanchayatelectionpic.twitter.com/mUFvRoNYMb
— Lokmat (@MiLOKMAT) January 19, 2021
इस्राईल पठाण, किशोर काळे, पंकज गोल्हर, अमोल गोल्हर, रामदास शेलोकार, इमरान मिर्झा, अफसरखॉ पठाण, बशीरखॉ पठाण, शेख रफीक शेख, बाळकृष्ण वानखडे, शेख साबीर शेख, दिगांबर इंगोले, शैलेश हूड यांचा नासीरच्या विजयात मोलाचा वाटा राहिला.