ग्रामपंचायत सदस्याची पोलीस ठाण्याच्या टॉवरवर ‘वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 09:41 PM2018-08-30T21:41:25+5:302018-08-30T21:43:19+5:30

ठाणेदाराने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला, मारहाण केली, असे सांगत एका ग्रामपंचायत सदस्याने गुरुवारी सकाळी दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून गळ्यात फास अडकवित वीरूगिरी केली. त्याच्या या चार तासाच्या शोले आंदोलनाने उपस्थितांचे मनोरंजन झाले.

Gram Panchayat member's police station tower 'Virugiri' | ग्रामपंचायत सदस्याची पोलीस ठाण्याच्या टॉवरवर ‘वीरूगिरी’

ग्रामपंचायत सदस्याची पोलीस ठाण्याच्या टॉवरवर ‘वीरूगिरी’

Next
ठळक मुद्देलाडखेड : पोलिसांवर मारहाणीचा आरोप, एसडीपीओंची मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ठाणेदाराने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला, मारहाण केली, असे सांगत एका ग्रामपंचायत सदस्याने गुरुवारी सकाळी दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून गळ्यात फास अडकवित वीरूगिरी केली. त्याच्या या चार तासाच्या शोले आंदोलनाने उपस्थितांचे मनोरंजन झाले. त्याचवेळी लाडखेड पोलिसांची पाचावरधारण बसली होती. एसडीपीओंनी मध्यस्थी केल्यानंतर हा वीरू खाली उतरला आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
श्रावण धुमा राठोड (४०) रा.चाणी ता. दारव्हा असे या वीरूचे नाव आहे. तो ग्रामपंचायत सदस्य आहे. २६ आॅगस्ट रोजी गावातच मारहाणीचे प्र्रकरण घडले. त्यात पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हे दाखल केले. या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक आपल्याला गोवल्याचा व ठाण्यात मारहाण केल्याचा श्रावणचा आरोप आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी करीत तो लाडखेड पोलीस ठाण्याच्या आवारातील टॉवरवर सकाळी चढला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने हा प्रकार उघडकीस आला. दोषी पोलिसांवर कारवाई न झाल्यास आपण येथेच गळफास घेऊ, असा इशारा त्याने दिला. प्रकरणाची माहिती मिळताच ठाणेदार सारंग मिराशी तेथे दाखल झाले. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक, अग्नीशमन दल तैनात करण्यात आले होते. श्रावणला अनेकांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यर्थ ठरला. चार तास होऊनही तो खाली उतरत नसल्याचे पाहून दारव्हा एसडीपीओ नीलेश पांडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्याला निष्पक्ष चौकशीची ग्वाही दिली. त्यानंतर तो खाली उतरला. त्याला यवतमाळात आणून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या शोले स्टाईल आंदोलनाची मात्र दिवसभर चर्चा होती. टॉवरला संरक्षक कूंपन असूनही श्रावण त्यावर चढला कसा असावा याची चर्चा घटनास्थळी होती.
 

Web Title: Gram Panchayat member's police station tower 'Virugiri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.