पांढरकवडा तालुक्यात राजकीय कंत्राटदारांना ग्रामपंचायतींचा नकार

By admin | Published: January 17, 2016 02:31 AM2016-01-17T02:31:42+5:302016-01-17T02:31:42+5:30

पंचायत समिती, कृषी विभाग, जिल्हा परिषदेमार्फत विविध निधी ग्रामपंचायतस्तरावर दिला जातो.

Gram Panchayats reject government contracts in Pandharvada taluka | पांढरकवडा तालुक्यात राजकीय कंत्राटदारांना ग्रामपंचायतींचा नकार

पांढरकवडा तालुक्यात राजकीय कंत्राटदारांना ग्रामपंचायतींचा नकार

Next

विविध विकासकामे : गावातील विकासावर होतो विपरित परिणाम
पांढरकवडा : पंचायत समिती, कृषी विभाग, जिल्हा परिषदेमार्फत विविध निधी ग्रामपंचायतस्तरावर दिला जातो. त्यातून होणारी कामे राजकीय कंत्राटदारांना देण्यासाठी आता अनेक ग्रामपंचायतींनी नकार दर्शविला आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामे करण्यासाठी राजकीय कंत्राटदारांची नवीनच जमात विकसीत झाली आहे. कित्येकदा कामाचे कंत्राट हे राजकीय ठेकेदार आपले वजन वापरून मिळवतात. मात्र ही कामे गावकऱ्यांना तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पसंद पडत नाही. त्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच ओरड होते. तथापि अधिकारी व राजकारण्यांच्या दबावाखाली ग्रामपंचायत चूप बसते. त्या कामांची देयके इच्छा नसतानाही काढून देण्यात येते. मात्र आता यापुढे सदर कामे ग्रामपंचायतच करणार, राजकीय ठेकेदाराना ही कामे दिली जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. तसा ठराव अनेक ग्रामपंचायतींनी घेतल्याचे एका सरपंचाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकारामुळे ग्रामपंचायत सक्षम होण्यास मदत होणार आहे. मात्र अधिकारी व राजकारणी आपल्या स्वार्थासाठी यामध्ये खोडा घालण्याची शक्यता बळावली आहे. पुढाऱ्यांनी गाव विकासासाठी राजकीय कंत्राटदारांना विकास कामे देण्यासाठी ग्रामपंचायतींवर दबाव आणु नये, अशी अपेक्षा आहे. त्यांनी ग्रामपंचायतींना सक्षम होण्यास हातभार लावावा, अशीही आशा आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gram Panchayats reject government contracts in Pandharvada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.