एक वर्षापासून गावात ग्रामसेवक फिरकलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:43 AM2021-09-11T04:43:24+5:302021-09-11T04:43:24+5:30
फोटो मंगेश चवरडोल वडकी : राळेगाव पंचायत समितींतर्गत येणाऱ्या पिंपरी-गाडेघाट या गटग्रामपंचायतीत तब्बल वर्षभरापासून ग्रामसेवक फिरकलेच नाही, असा ग्रामस्थांचा ...
फोटो
मंगेश चवरडोल
वडकी : राळेगाव पंचायत समितींतर्गत येणाऱ्या पिंपरी-गाडेघाट या गटग्रामपंचायतीत तब्बल वर्षभरापासून ग्रामसेवक फिरकलेच नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामवासीयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पिंपरी-गाडेघाट ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व सचिवांचा मनमानी कारभार सुरू असल्याची ओरड आहे. ग्रामपंचायतीमार्फत पिंपरी येथे अनेक कामे करण्यात आली. आमदार, जिल्हा परिषद सदस्य निधीतून तेथे विकास कामे झाली. मात्र, गाडेघाटला पदाधिकारी व सचिव विसरले. गाडेघाट हे गाव पूर्ण आदिवासी वस्ती आहे. तेथे ग्रामपंचायतीने शासनाच्या कुठल्याही सुविधा पुरविल्या नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
गाडेघाटचे नागरिक ग्रामपंचायतीत गेले असता सचिव कधीच भेटत नाही. या गावात सचिव अद्याप फिरकले नाही. सचिव नेमके कुठे भेटणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गावात समस्यांची गर्दी झाली. झाडे, झुडपे वाढली. घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गाडेघाट येथे पिण्याच्या पाण्यात टाकण्यासाठी साधे ब्लिचिंग पावडर देण्यात येत नाही.
गावातील आदिवासी बांधवांना सचिवांच्या कामचुकार धोरणामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन ग्रामसेवकांना किमान महिन्यातून एकदा तरी गाडेघाटला पाठवावे, अशी मागणी गाडेघाटचे नागरिक करीत आहेत.
बॉक्स
आमदार साहेब लक्ष द्या हो
गाडेघाट गावात जाण्यासाठी नाल्यावर पूल नाही. त्यामुळे गावातून बाहेर ये-जा करण्याची मोठी समस्या आहे. रात्री, अपरात्री कुणी आजारी पडल्यास चारचाकी वाहनत्द्धाध्दा गावात येऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागतात. त्यामुळे किमान पुलाकडे तरी आमदारांनी थोडे लक्ष द्यावे, अशी मागणी रामेश्वर सिडाम यांनी केली.
कोट